हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून ३९ टक्के पीक कर्जवाटप
नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१ साठी दोन हजार ५३९ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बॅंकांना दिले होते. परंतु जिल्ह्यात उद्दिष्टांच्या एकूण ५६ टक्केच पीक कर्जवाटप झाले.
नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१ साठी दोन हजार ५३९ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बॅंकांना दिले होते. परंतु जिल्ह्यात उद्दिष्टांच्या एकूण ५६ टक्केच पीक कर्जवाटप झाले.
जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी दोन्ही हंगामात केवळ ३९ टक्केच पीक कर्जवाटप केल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ जिल्हा बॅंकेने ११९ टक्के व ग्रामिण बॅंकेने १०५ पीक कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.
जिल्हास्तरीय बॅंकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी आगामी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी दोन हजार ३१ कोटी, तर रब्बीसाठी ५०७ कोटी असे एकूण दोन हजार ५३९ कोटींचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट २८ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले होते.
जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिली होती. पीककर्ज माफीसाठी पात्र ठरलेल्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग झाल्यानंतर त्या खात्याला नव्याने कर्ज मिळेल, अशा विचारात असलेल्या शेतकऱ्यांना मात्र राष्ट्रीयीकृत बॅंकेने कर्जवाटप करण्यात दिरंगाई केल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख एक हजार ५६८ खातेदारांना ७६६ कोटी १२ लाखांचे कर्ज वाटप केले. जिल्हा बॅंकेकडून ५७ हजार ८४ शेतकऱ्यांना दोन २७७ कोटी ७० लाख, तर महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेने ६१ हजार २५४ शेतकऱ्यांना ३८१ कोटी ५१ लाखांचे कर्जवाटप केले. जिल्ह्यात ५६ टक्क्यानुसार आजपर्यंत खरिपासाठी एकूण एक लाख ६४ हजार ३२९ शेतकऱ्यांना एक हजार १९ कोटी ९६ लाख रुपयांचे कर्जवाटप केले.
रब्बीत ४०५ कोटींचे वाटप
रब्बीमध्ये एकूण ५५ हजार ५७७ शेतकऱ्यांना ४०५ कोटी ३७ लाख कर्जवाटप केले. दोन्ही हंगामात ५६.१२ टक्क्यांनुसार दोन लाख १९ हजार ९०६ शेतकऱ्यांना १४२५ कोटी ३३ लाखांचे कर्जवाटप केले.
- 1 of 1099
- ››