चंद्रपूर जिल्ह्यात पीकविम्याचा ४ कोटींचा लाभ

चंद्रपूर जिल्ह्यात पीकविम्याचा ४ कोटींचा लाभ
चंद्रपूर जिल्ह्यात पीकविम्याचा ४ कोटींचा लाभ

चंद्रपूर ः पीकविम्यासंदर्भात सर्वदूर ओरड होत असताना चंद्रपूर जिल्ह्यात ४ कोटी ९० लाख ५५ हजार ६२३ रुपयांचा परतावा विमा पात्र शेतकऱ्यांना मिळाला आहे. शेतकरी हिस्सा म्हणून ६ कोटी २९ लाख २१ हजार ६८६ रुपयांचा हप्ता भरण्यात आला होता.  पीक कापणी प्रयोगातील उंबरठा उत्पन्न विचारात घेत विमा मोबदला दिला जातो. त्याकरिता काही वर्षातील उत्पादकतेची सरासरी विचारात घेण्यात येते. कर्जदार, बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे शेतकरी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत विमा काढण्यास पात्र ठरतात. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणीपश्‍चात नुकसान, अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची पीकविम्याची भरपाई मिळते. पीकविमा रकमेच्या दोन टक्‍के नगदी व व्यापारी पिकासाठी पाच टक्‍के विमा हप्ता भरावा लागतो. अधिसूचित पिकांसाठी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा पीकविमा हप्ता बॅंकेतून कपात केला जातो. २०१८-१९ या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविम्याची माहिती कंपन्यांपर्यंत पोचविण्यात आली होती. त्यानंतर कंपन्यांकडून विमा मोबदला देण्यात आला. या हंगामात ५४ हजार ५७० हेक्‍टर क्षेत्र पीकविम्याच्या कक्षेत आले होते. शेतकऱ्यांकडून ६  कोटी २९ लाख २१ हजार ६८६ रुपये पीकविमा हप्ता म्हणून कंपनीकडे जमा करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील २ हजार ७७७ शेतकरी निकषात पात्र ठरल्याने ४ कोटी ९० लाख ५५ हजार ६२३ रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आला आहे. 

विमा प्रस्तावाची मुदत वाढवा खरीप २०१९ या वर्षातील हंगामाकरिता प्रस्ताव सादर करण्याची मुदत २४ जुलैपर्यंतच होती. योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद असला तरी विम्याच्या योजनेसाठी नोंदणीकरिता सामूहिक सेवा केंद्रावर गर्दी झाल्याने अनेकांना अर्जच करता आला नाही. त्यामुळे योजनेकरिता कालावधी वाढवावा, अशी मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com