नांदेड जिल्ह्यात केळी उत्पादकांना चार कोटींचा विमा मंजूर

नांदेड : जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेतंर्गत अंबिया बहारासाठी सन २०१९ - २० मध्ये विमा भरलेल्या केळी उत्पादकांना तीन कोटी ९४ लाख ३७ हजार १५० रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.
4 crore insurance sanctioned to banana growers in Nanded district
4 crore insurance sanctioned to banana growers in Nanded district

नांदेड : जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेतंर्गत अंबिया बहारासाठी सन २०१९ - २० मध्ये विमा भरलेल्या केळी उत्पादकांना तीन कोटी ९४ लाख ३७ हजार १५० रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. 

जिल्ह्यातील सात तालुक्यातील १९ पैकी नऊ मंडळांत हा विमा लागू मंजूर झाला आहे. या विमा योजनेत पाच २३८ शेतकऱ्यांनी तीन हजार ७२६ हेक्टरवरील केळीसाठी विमा भरला होता, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. 

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, हदगाव, लोहा, मुदखेड, नायगाव, नांदेड या तालुक्यातील १९ महसूल मंडळांतील पाच हजार २३८ शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेतंर्गत अंबिया बहारासाठी सन २०१९ - २० मध्ये विमा भरला होता. तीन हजार ७२६ हेक्टरसाठी दोन कोटी ४५ लाख ९७ हजार ३४२ रुपये विमा हप्ता कंपनीकडे जमा केला होता.

दरम्यान, यातील १९ पैकी दहा मंडळांत विमा मंजूर झाला. तर, नऊ मंडळात विमा नामंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या मरखेल, शेवडी बा., बरबडा व वसरणी या महसूल मंडळात मुद्दा क्रंमाक तीननुसार व मालेगाव, भोकर, हदगाव, मनाठा, मुदखेड, मुगट या मंडळात मुद्दा क्रमांक चारनुसार नुकसान भरपाइची प्रमाणके (ट्रिगर) लागू झाल्याचे कंपनीकडून कळविल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.  

केळी फळपिक विमा मंजूर नसलेल्या मंडळातील हवामान नोंदी तपासा, असे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी कळविले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनालाही कळविले आहे. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

जास्त क्षेत्र असलेल्या मंडळात विमा कंपनीने विमा भरलेल्या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वगळले आहे. यातून शेतकऱ्यांना फसविल्यामुळे याबाबत चौकशी होऊन इतर मंडळातील शेतकऱ्यांना विमा मिळावा. - अवधूत कदम, शेतकरी, पांगरी (ता. अर्धापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com