Agriculture news in Marathi 40% area in Akola district without cultivation | Agrowon

अकोला जिल्ह्यात ४० टक्के क्षेत्र लागवडीविना

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

अकोला ः जिल्ह्यात जून महिन्यात असमतोल स्वरूपाचा पाऊस झाल्याचा फटका पेरणीला बसला आहे. पावसाचा पहिला महिना उलटला तरी पेरणी अवघी ६० टक्क्यांच्या आत राहिलेली आहे. आजवर दोन लाख ८४ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून त्यात एक लाख ४६ हजार हेक्टर सोयाबीनची लागवड सर्वाधिक झाली आहे.

अकोला ः जिल्ह्यात जून महिन्यात असमतोल स्वरूपाचा पाऊस झाल्याचा फटका पेरणीला बसला आहे. पावसाचा पहिला महिना उलटला तरी पेरणी अवघी ६० टक्क्यांच्या आत राहिलेली आहे. आजवर दोन लाख ८४ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून त्यात एक लाख ४६ हजार हेक्टर सोयाबीनची लागवड सर्वाधिक झाली आहे.

त्यापाठोपाठ ८० हजार हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे. अद्यापही ४० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण व्हायची आहे. यंदाच्या हंगामासाठी ४ लाख ८४ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मृग नक्षत्रात पावसाला सुरुवातही झाली. त्यानंतर काही दिवसांतच पेरण्या सुरू झाल्या. परंतु जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात पाऊस अनियमित स्वरुपात झाल्याने पेरण्यांना फटका बसला. कुठे सोयाबीन पेरले ते उगवले नाही. कुठे जोराच्या पावसाने बियाणे जमिनीत दबले. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागणार आहे. याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

शिवाय ज्या कंपन्यांचे बियाणे पेरले व उगवले नाही अशा कंपन्यांकडून भरपाई, मदत मिळते का? या प्रतीक्षेत हे सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकरी थांबलेले आहेत. मागील महिनाभरात मोजके दिवस पावसाने हजेरी दिली आहे. शिवाय जो पाऊस झाला तो तडाखेबंद झाल्याने नुकसानकारक अधिक ठरला. जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक पावसाने हजेरी दिली नसल्याने हंगामाच्या सुरुवातीपासूनच अडचणी सुरू झाल्या आहेत. पावसाचा आढावा घेतला असता यंदा मूर्तिजापूर तालुका पिछाडीवर पडला आहे. या तालुक्यात आजवर १०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. सरासरीच्या ६७.८५ टक्केच नोंद झालेली आहे.

जिल्‍ह्यात केवळ तेल्हारा (११२ मिली), पातूर (११० मिली) हे दोन तालुके सोडले तर अजूनही जूनच्या सरासरी इतर पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांनी मिळालेल्या ओलीवर पेरणी केली. काही ठिकाणी उगवणही झाली आहे. परंतु सोयाबीनच्या उगवणीबाबत तक्रारींचा सूर गावागावातून येत आहे.

पीक यंदाचा लक्ष्यांक लागवड टक्के
तूर ६५००० ३५९७७ ६४
मूग ३१००० १०७३६ ४७ 
उडीद २५००० ७६३८ ४६
सोयाबीन १६०००० १४६४९४ ६७
कापूस १६०००० ८०९२६ ५२
एकूण ४८४२०० २८४९७८ ५८.९७

 


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
‘कृषी अधिकारीच म्हणतात, खतांसंदर्भात...पुणे ः शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासत आहे. कृषी...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...