agriculture news in marathi 40 per cent decline in trumpet imports from Khandesh | Agrowon

खानदेशातील तुरीच्या आवकेत ४० टक्के घट

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक अत्यल्प आहे. दरही सहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.  

जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक अत्यल्प आहे. दरही सहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.  दरात मध्यंतरी चढउतार झाले. परंतु दर सहा हजार रुपयांखाली आलेले नाहीत. कमी दर्जाच्या तुरीचे दर ५४०० रुपयांपर्यंत आहेत.

देशी प्रकारच्या तुरीचे दर जळगाव, अमळनेर, चोपडा भागातील बाजारात सहा हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. तुरीची मागणी बाजारात यंदा बऱ्यापैकी होती. दर हमीभावाच्या नजीक व हमीभावापेक्षा अधिक राहिले. त्यामुळे शासकीय खरेदीलाही प्रतिसाद मिळालेला नाही. शासकीय खरेदी जळगाव, अमळनेर आदी केंद्रांमध्ये झालेलीच नाही. 

जळगाव, चोपडा, अमळनेर येथील बाजार तुरीची आवक गेल्या पंधरवड्यात मिळून प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल एवढी होती. या आवकेत या पंधरवड्यात ४० ते ४२ टक्के घट झाली आहे. आवक फक्त प्रतिदिन सरासरी ११०० क्विंटल एवढीच राहिली आहे. दर स्थिर आहेत. सध्या जळगाव येथील बाजारात जालना, औरंगाबाद, लातूर भागातून मोठे व्यापारी तुरीचा पुरवठा करून घेत आहेत. जळगावातील मोठे खरेदीदार मध्य प्रदेश व उत्तरेकडे तुरीची पाठवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांकडील आवक कमी झाली आहे. 

आवक अत्यल्प

खानदेशात जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर, रावेर, अमळनेर, पाचोरा भागात तूर लागवड झाली होती. धुळ्यात फारशी लागवड झाली नव्हती. इतर शेतकरी तूर, कडधान्य पिकात आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पादन घेतात. तुरीची मळणी जानेवारीत सुरू झाली. या महिन्याच्या सुरुवातीला आवक बऱ्यापैकी होती. परंतु सध्या आवक कमी झाली आहे. पुढे आणखी आवक कमी होईल. धुळ्यातील शिरपूर बाजार समितीतही तुरीची आवक अत्यल्प असल्याची माहिती मिळाली. 


इतर ताज्या घडामोडी
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा...नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू...
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची...नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब...
‘एमआरपी’नुसारच खतांची खरेदी करावी सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर...
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज...अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४०...
सटाणा बाजार समिती आवाराबाहेर अवैध...नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही...
नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत...
भोकरखेडात चार वर्षांपासून शेतकरी वीज...वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल....
टेंभू योजनेचे पाणी सोडले; ‘बंदिस्त पाइप...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात टेंभू...
प्रत्येक गावाचा होणार कृषी विस्तार...जालना : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे...
तमाशा कलावंतांसाठी सरसावले मदतीचे हात नगर ः : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे टाळेबंदी...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...
कांदा बाजारावर ‘कोरोना’चा परिणाम नगर : कोरोना व्हायरसची बाधा वाढत असल्याचा बाजार...
महाराष्ट्राला रेमडिसिव्हिर देण्यास ‘...मुंबई : केंद्र सरकारकडून रेमडिसिव्हिर निर्यातीवर...
डाळिंब सल्लाहस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग...
कृषी सल्ला : आंबा, काजू, नारळ, सुपारीनवीन आंबा लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील...
कृषी सल्ला : सुरु ऊस, कांदा, फळपिकेवातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या...
राज्यात उष्ण, ढगाळ हवामानसोमवार ते बुधवारपर्यंत (ता.१९ ते २१) १००८...
नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंत...नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
देशात ‘जमीन सुपोषन व संरक्षण जनजागरण’...औरंगाबाद : संपूर्ण देशभरात मंगळवारपासून (ता. १३...
निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ‘ट्रँक्टर...अमरावती : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार,...