agriculture news in Marathi 40 court cases in bogus soybean seed Maharashtra | Agrowon

निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटले

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

काहींना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. वाशीम जिल्ह्यात कृषी विभागाने वऱ्हाडात सर्वाधिक ४० कंपन्यांचे बियाणे अप्रमाणीत आल्या प्रकरणात न्यायालयात खटले दाखल केले आहेत. 

वाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे शेतकरी कमालीचा फसला आहे. काहींना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. वाशीम जिल्ह्यात कृषी विभागाने वऱ्हाडात सर्वाधिक ४० कंपन्यांचे बियाणे अप्रमाणीत आल्या प्रकरणात न्यायालयात खटले दाखल केले आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईबाबत पुढील दिशा निश्‍चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

वाशीम जिल्हा हा सोयाबीनचे आगार समजल्या जातो. या जिल्ह्यात तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. यंदाही एवढे क्षेत्र लागवडी खाली आलेले आहे. सोयाबीन उत्पादक बियाणे कंपन्यांसाठी हा जिल्हा फायदेशीर समजला जातो. मात्र यंदा बियाण्यात शेतकऱ्यांची फसगत झाली. शेतकऱ्यांनी विकत घेतलेले बियाणे उगवले नसल्याच्‍या शेकडो तक्रारी आल्या होत्या. काही तक्रारी या कंपन्यांनी वरचेवर सोडविल्या. 

कृषी खात्याने या हंगामात विविध बियाण्याचे सुमारे १७७ नमुने काढले होते. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यानंतर ५१ नमुने अप्रमाणीत आले. यापैकी ४२ प्रकरणे हे न्यायालयीन खटले दाखल करण्याच्या पात्रतेचे आहेत. तर नऊ प्रकरणे हे संबंधित कंपन्यांना ताकीद देण्याच्या पात्रतेचे निघाले.

कृषी विभागाने पात्र असलेल्यापैकी ४० प्रकरणात जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात न्यायालयीन खटले दाखल केले आहेत. यात शासनाशी निगडीत तसेच खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. या प्रकरणात तालुका निरीक्षक किती सक्षमपणे बाजू मांडतात यावर बरेच काही अवलंबून आहे.

सोयाबीनसंदर्भातील खटले सर्वाधिक
जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याबाबत सर्वाधिक तक्रारी आलेल्या आहेत. कृषी विभागाने सोयाबीनचे ६७ नमुने काढले होते. त्यापैकी ४३ नमुने हे अप्रमाणित आले. यापैकी ३४ नमुन्याबाबत न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. नऊ कंपन्यांना ताकीद देण्यात आली आहे.

बियाणे नमुन्यांची स्थिती
काढलेले बियाणे नमुनेः
१७७ 
अप्रमाणीत नमुनेः ५१ 
सोयाबीन नमुनेः ६७ 
दाखल केलेले न्यायालयीन खटलेः ४० 
 


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...