भोरच्या विकासकामांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

भोर विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग व मोठ्या पुलासाठी मार्च २०२२च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ४० कोटी ५६ लाख रुपये खर्चाच्या कामांना निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
40 crore fund sanctioned for Bhor development works
40 crore fund sanctioned for Bhor development works

पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात जोरदार पाऊस होत असल्याने रस्त्याचे मोठे नुकसान होते. त्यामुळे भोर विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग व मोठ्या पुलासाठी मार्च २०२२च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ४० कोटी ५६ लाख रुपये खर्चाच्या कामांना निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.  मंजूर कामांमध्ये भोर तालुक्यासाठी १४ कोटी २६ लाख रुपये खर्चाची कामे होणार आहेत. यात सारोळा-वीर-न्हावी रस्ता सुधारण्यासाठी ५ कोटी, आंबेघर-आंबवडे रस्ता सुधारण्यासाठी, लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी ८५ लाख, भोर-पसुरे-पांगारी रस्ता सुधारण्यासाठी २ कोटी ८५ लाख, इंगवली -कोळवाडी- किकवी-बांदलवाडी रस्ता सुधारण्यासाठी १ कोटी ९० उत्रौली-कान्हवडी रस्त्यासाठी १ कोटी ६६ लाख रुपये खर्चाच्या कामांचा समावेश आहे.  वेल्हे तालुक्यासाठी १७ कोटी ५० लाख रुपये खर्चाची कामे होणार आहेत. यामध्ये महाड मढेघाट- वेल्हा-नसरापूर-चेलाडी रस्ता रुंदीकरणासह, मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी, महाड-मढेघाट वेल्हे नसरापूर- चेलाडी रुंदीकरणासह सुधारणा व डांबरीकरण करणे ५ कोटी, महाड-मढेघाट वेल्हे-नसरापूर-चेलाडी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा आणि डांबरीकरण करणे ३ कोटी, महाड-मढेघाट-वेल्हे-नसरापूर चेलाडी रस्ता ४ कोटी रुपये, साईव-आंबेगाव-कोशिमघर-गोंडेखल-दापसरे-घोल करणे १ कोटी ९० लाख, कासुर्डी-हातवे-ताभाड-चिरमोडी रस्त्यासाठी १ कोटी ६६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.  मुळशी तालुक्यातील कामांसाठी ८ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, पाषाण-सूस-नांदे-मूग-बहुली रस्ता ५ कोटी, घोटावडे-रिहे आंधळे रस्ता ३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

वरंधा घाटासाठी १० कोटी  वरंधा घाट मार्गावर पडलेल्या, खचलेल्या मोऱ्या आणि या मार्गावरील उंबार्डेवाडी येथील कोसळलेल्या रस्त्याची दुरुस्ती होणार असून, यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून हे काम पूर्ण होणार आहे. 

शेवते रस्त्याचे काम सुरू  पुणे ते नसरापूर, वेल्हे, भोडी-पांगारी, पिवशी ते शेवते (महाड तालुका) अशा १०५ किलोमीटरच्या मार्गासाठी ३४ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ५ कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचे टेंडर झाले आहे. हे काम १५ मार्चपासून सुरू होणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com