मध्यपूर्व प्रदेशातील पावसात ४० टक्के घट

विविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या प्रमाणामध्ये तीव्र घट (सुमारे ४० टक्के पर्यंत) होण्याच्या शक्यता दर्शवण्यात येत आहेत. त्यामागील मूलभूत घटकांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न मॅस्साच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथील संशोधकांनी केला आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल ऑफ क्लायमेट मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
A five-year average of the Middle East climate
A five-year average of the Middle East climate

विविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या प्रमाणामध्ये तीव्र घट (सुमारे ४० टक्के पर्यंत) होण्याच्या शक्यता दर्शवण्यात येत आहेत. त्यामागील मूलभूत घटकांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न मॅस्साच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथील संशोधकांनी केला आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल ऑफ क्लायमेट मध्ये प्रकाशित करण्यात  आले आहेत.  भूमध्य प्रदेशातील वातावरण येत्या काही वर्षामध्ये लक्षणीयरीत्या कोरडे होणार असल्याचे भाकीत विविध प्रारूपाद्वारे व्यक्त करण्यात येत आहे. हिवाळी पावसाच्या हंगामात पर्जन्यमानामध्ये ४० टक्क्याने घट होण्याची शक्यता मांडली जाते. एमआयटी येथील विद्यार्थी संशोधक अलेक्झांडर ट्युएल आणि प्रो. अलफातिह अलताहिर यांनी या भाकितांमधील मूलभूत घटकांचे विश्लेषण केले आहे. त्यांनी मध्यपूर्वेतील प्रामुख्याने मध्य पूर्व आफ्रिका आणि वायव्य आफ्रिका येथील हवामानातील बदलामागील यंत्रणांचा शोध घेण्याचा प्रयत्न  केला आहे.  जागतिक पातळीवर हवामान बदलासंदर्भात वेगवेगळी चक्रीय प्रारूपे मांडली जातात. त्यातील बहुतांश प्रारूपांनी सर्वत्र तापमानामध्ये होत चाललेली वाढ आणि त्याचा परिणाम म्हणून तयार झालेले बाष्प वाहून जाऊन अनेक ठिकाणी पर्जन्यमानातही वाढ होणार असल्याचे सुचवले आहे. मात्र, या नियमित चक्राला अपवाद म्हणून मध्य पूर्वेतील प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचे सांगितले जाते. त्याविषयी माहिती देताना प्रो. अलताहिर म्हणाले की, पृथ्वीवरील अन्य कोणत्याही प्रदेशाच्या तुलनेमध्ये मध्यपूर्वेतील प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण प्रचंड घटणार आहे. कमी होण्याचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत असल्याने त्याचा एकूण मानव आणि समाजजीवनांवर तीव्र परिणाम होणार आहे.  वेगवेगळ्या प्रारूपांमध्ये काही फरक असले तरी बहुतांश सर्व प्रारूपांमध्ये या बाबतीत मात्र एकवाक्यता दिसते. प्रमाणामध्ये १० ते ६० टक्क्यांपर्यंत फरक दाखवण्यात येतो. मात्र, हवामानाचे योग्य स्पष्टीकरण कोणीही नेमकेपणाने देत नसल्याने अभ्यास आणि विश्लेषण करण्यात आले.  ट्यूएल आणि अलताहिर यांना मध्यपूर्वेतील संभाव्य कोरडेपणा हा वातावरणातील उष्णतेच्या दोन वेगवेगळ्या परिणामांचा एकत्रित परिणाम असल्याचे लक्षात आले. १) वरील वातावरणातील चक्रामध्ये होत असलेले बदल आणि २) जमीन आणि समुद्राच्या तापमानातील फरकामध्ये झालेली घट. कारण कोणत्याही एका घटकाचा पावसावर एवढा परिणाम होणार नाही. मात्र, दोन्हीच्या एकत्रीकरणामुळे हा वैशिष्ट्यपूर्ण दीर्घ कोरडा काळ बहुतांश सर्व प्रारूपामध्ये दिसून  येत आहे.  वेगवान अशा उच्च उंचीवरील वाऱ्यांमुळे (त्याला मीड लॅटिट्यूट जेट स्ट्रीम म्हणतात.) पश्चिम ते पूर्व हवामानाच्या पॅटर्नमध्ये ताकदवान आणि स्थिर असे प्रवाह दिसून येतात. युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिका या प्रदेशांवर याचा परिणाम होतो. जागतिक तापमानामध्ये वाढ होत असताना त्याचा परिणाम मीड लॅटिट्यूट जेट स्ट्रीमची ताकद वाढण्यामध्ये होत असल्याचे सर्व प्रारूपातून स्पष्ट होते. मात्र, उत्तर गोलार्धामध्ये हे वारे रॉकीज, आल्प्स आणि हिमालयीन पर्वतरांगांना धडकत पुढे जाते. त्यातून स्थिर अशा प्रवाहामध्ये लाटांसदृश्य पॅटर्न तयार होतात.  या प्रदेशामध्ये सातत्याने उच्च आणि कमी दाबांचे पट्टे तयार होतात. उच्च दाबाचे पट्टे हे स्वच्छ, कोरड्या वाऱ्याशी संबंधित असून, कमी दाबाचे पट्टे हे आर्द्रतायुक्त हवा आणि वादळी वाऱ्याशी संबंधित आहे. मात्र, जसजशी हवा गरम होत जाते, तसतसे हवेच्या लाटांचे पॅटर्नही बदलत जातात.   मध्यपूर्वेतील भौगोलिक स्थितीमुळे हवेच्या प्रवाहाचे पॅटर्न वेगवान राहतात. या प्रदेशावर उच्च दाबाचे पट्टे राहतात. उच्च दाबांच्या पट्ट्यामुळे कोरडेपणा वाढून पावसाचे प्रमाण कमी राहते. केवळ हवेच्या दाबांच्या यंत्रणेवर मध्यपूर्वेतील कोरडेपणामागील कारण शोधणे थोडेसे अडचणीचे ठरणार आहे. त्यातून सातत्यपूर्ण व इतक्या दीर्घ कोरडेपणामागे दुसरी यंत्रणा - जमीन आणि समुद्राच्या तापमानातील फरक ही महत्त्वाची ठरणार आहे. कारण जमीन ही समुद्राच्या पाण्याच्या तुलनेमध्ये वेगाने गरम होते. तज्ज्ञांच्या मते...

  • ट्यूएल यांनी सांगितले, की अन्य प्रदेशाच्या तुलनेमध्ये मध्यपूर्वेतील भौगोलिकताही वेगळी आहे. मूलतः सर्व बाजूंनी भूमी असलेला मोठा समुद्र अन्य कोठेही नाही. जेव्हा प्रारूपामध्ये समुद्राच्या सभोवतीची जमीन ३ ते ४ अंश सेल्सिअसने तापते, त्यावेळी समुद्र साधारण २ अंशाने तापतो. हा दोन्हीच्या तापमानातील फरक गेल्या काही काळामध्ये वेगाने कमी होत आहे. उलट हवेच्या दाबातील फरक वाढत आहे. उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे घड्याळाच्या दिशेने फिरणारे वाऱ्यांचे चक्राकार पॅटर्न मध्यपूर्वेच्या खोऱ्यामध्ये दिसून येतात. 
  • अलताहिर म्हणाले की, भविष्यातील अंदाजानुसार कोरड्या वातावरणाचा सर्वात अधिक फटका बसणारे प्रदेश म्हणून वायव्य आफ्रिका ( मोरोक्कोसह) आणि मध्यपूर्वेच्या पूर्वेकडील प्रदेश (तुर्की आणि लेवॅन्ट) हे होत. या संभाव्य वातावरणाचे परिणाम सध्याही दिसू लागले आहेत. येथे आताही पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट जाणवत आहे. आम्ही नोंदवलेल्या पावसाच्या प्रमाणामध्ये पूर्वेकडील भागामध्ये लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट होते. 
  • पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढत जाणार... अलताहिर हे मोरोक्को येथील सरकारी संस्थांसह या विषयावर काम करत आहे. या निष्कर्षांचे रूपांतर संभाव्य नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेवर नेमके काय परिणाम होतील, याचा विचार करण्यात येत आहे. पाण्याचे स्रोतांचे नियोजन करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची निर्मितीवर भर दिला जात आहे. शेतीमध्येही काटेकोर शेती पद्धतींचा (िप्रसीजन फार्मिंग) अवलंब करण्यात येत आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com