agriculture news in Marathi 40 lac ton cotton procurement in Nashik Division Maharashtra | Agrowon

नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५ शेतकऱ्यांकडून एकूण ४० लाख २६ हजार ४१७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे.

नगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५ शेतकऱ्यांकडून एकूण ४० लाख २६ हजार ४१७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. तर, लॉकडाउनच्या काळात ३३ हजार ७०८ शेतकऱ्यांकडून ८ लाख ८४ हजार १३२ क्विंटल खरेदी झाली.

विभागात सर्वाधिक जळगाव व त्यापाठोपाठ नगर जिल्ह्यात कापूस खरेदी झाली. पणन महासंघामार्फत आत्तापर्यंत ४१ हजार २५ शेतकऱ्यांकडून १३ लाख १० हजार ४७१ क्विंटल, तर ‘सीसीआय’कडून ६७ हजार ५८४ शेतकऱ्यांचा १७ लाख ५३ हजार २८ क्विंटल आणि खाजगी बाजाराच्या माध्यमातून १८ हजार ५८६ शेतकऱ्यांकडून ७ लाख १२ हजार ८६२ क्विंटल तर बाजार समितीमधील अनुज्ञाप्तीधारक व्यापाऱ्यांमार्फत १० हजार १५० शेतकऱ्यांकडून २ लाख ५० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याचे विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यातील चापडगाव (ता. शेवगाव) कापूस खरेदी केंद्रावर लॉकडाउननंतर खरेदी सुरु झाल्यावर तेथे शेतकऱ्यांच्या कापसाची अनाधिकृतपणे मोकळ्या वाहनात वजन टाकून वजनात घट केली जात होती. याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात कापूस लुटला गेला. एका जागृत शेतकऱ्याने याबाबत व्हिडिओ व्हायरल केला होता.

‘अॅग्रोवन’नेही याबाबत सातत्याने वृत्त प्रकाशीत केल्यावर पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार  झाली. त्यावर संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागवला. त्यानंतर केंद्राकडून तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना तक्रार नसल्याचे लिहून घेण्याचा आग्रह करत प्रकरण दाबले. वरिष्ठांकडूनही त्याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने अनधिकृत कपातीची चौकशी झाली नाही.

जिल्हानिहाय कापूस खरेदी क्विंटलमध्ये (कंसात शेतकरी)  

  • जळगाव ः २५ लाख ५५ हजार ६५५ (७४ हजार ४९९)
  • नगर ः ५ लाख ०९ हजार ७३४
    (३० हजार १५४ )
  • धुळे ः ४ लाख ५० हजार २३ (१४ हजार १५६)
  • नंदुरबार ः ४ लाख ४४ हजार ४१०
    (१६ हजार ६०३) 
  • नाशिक ः ६६ हजार ५९३ (१ हजार ९३३)

इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...