नगर ः लाळ्या-खुरकुताच्या प्रतिबंधासाठी ४० लाखांची औषधे

लाळ्या-खुरकुताच्या प्रतिबंधासाठी ४० लाखांची औषधे
लाळ्या-खुरकुताच्या प्रतिबंधासाठी ४० लाखांची औषधे

नगर ः जिल्हा परिषदेच्या सेस अनुदानातून जिल्ह्यातील जनावरांना लाळ्या-खुरकूत प्रतिबंधक औषधांसाठी ४० लाख रुपयांच्या खर्चास आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याशिवाय अनुसूचित जातीच्या लाभार्थींच्या जनावरांनाही ४० लाखांची जंतुनाशके, तसेच औषधे पुरविण्यात येतील, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक बैठक विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, उमेश परहर, अनुराधा नागवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळांच्या आवारातील विजेचे पोल व रोहित्रे हलविण्याच्या विषयावरही चर्चा झाली. ज्या शाळेच्या आवारात विजेचे पोल व रोहित्रे आहेत, त्या शाळांची यादी तयार केली होती; मात्र अनेक ठिकाणची कामे न होताच ती पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आल्याची तक्रार काही सदस्यांनी केली. त्यावर संबंधित कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन विखे यांनी दिले. जिल्हा वार्षिक नियोजनात या वर्षी अपारंपरिक ऊर्जा कार्यक्रमाअंतर्गत प्राप्त झालेल्या ५० लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, सदाशिव पाचपुते, अनिल कराळे, प्रताप शेळके, माधव लामखडे, सुप्रिया पाटील, अनिता हराळ, महेश सूर्यवंशी यांची चर्चेत भाग घेतला.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ६५ लाख माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी या वर्षी २५ लाख रुपये खर्च करण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्यासाठी या आर्थिक वर्षात ४० लाखांचा निधी देण्यासही स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com