खतांचा ४० हजार मेट्रिक टन साठा शिल्लक

खतांची कोणतीही टंचाई भासणार नाही. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू अाहे. तीन लाख ४० हजार मेट्रिक टन खते पुढील हंगामासाठी मिळतील. जून व जुलैमध्ये खतपुरवठा सुरळीत कसा राहील, यावर कटाक्ष असेल. रब्बीमधील खतेही शिल्लक असल्याने टंचाई नाही. - मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
खतांचा ४० हजार मेट्रिक टन साठा शिल्लक
खतांचा ४० हजार मेट्रिक टन साठा शिल्लक

जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामाला फटका बसल्याने खतांची अपेक्षित उचल झाली नाही. परिणामी रब्बी हंगामात जिल्ह्यात विविध खतपुरवठादारांकडून आलेली सुमारे ४० हजार मेट्रिक टन विविध खते शिल्लक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.  

शिल्लक खतांमध्ये युरिया, संयुक्त खते, फॉस्फेट अधिक प्रमाणात पडून आहेत. ही खते खत विक्रेते, कंपन्यांकडे आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती कृषी विभागाने संकलित केली. ई- पॉस (पॉइंट ऑफ सेल) यंत्रणेच्या मदतीने ही माहिती संकलित करणे सोपे झाले असून, नेमकी माहिती मिळाली आहे. दुष्काळी स्थितीमुळे खतांची मागणी कमी होती. सध्याही खतांची उचल चोपडा, रावेर, यावल वगळता इतर भागात अपवादानेच आहे. सुमारे सात ते आठ हजार मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे. 

आगामी खरिपासाठीदेखील खतांबाबत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तयारी केली आहे. खतपुरवठ्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार खरिपासाठी तीन लाख ४० हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा लक्ष्यांक मंजूर झाला आहे. त्यांचा पुरवठा या महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत होईल. सर्वाधिक पुरवठा जून व जुलैमध्ये करून घेण्याचा प्रयत्न कृषी विभाग करेल, असे सूत्रांनी सांगितले. 

खरिपात सुमारे एक लाख १५ हजार मेट्रिक टन युरियाचा पुरवठा होईल. यापाठोपाठ फॉस्फेट, पोटॅश व संयुक्त खतांचा पुरवठा होईल. खरिपात खतांची मागणी जून व जुलैमध्ये असणार आहे. परंतु खतांच्या मागणीचे गणित पावसावरच अवलंबून असल्याने या दृष्टीने कृषी विभाग काम करीत असल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com