agriculture news in Marathi 40 varieties of grapes will import Maharashtra | Agrowon

द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए. के. सिंग

गणेश कोरे
रविवार, 8 डिसेंबर 2019

पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे जगभरातील विविध फळांचे वाण भारतात आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. युरोप आणि अमेरिकेतून द्राक्षाचे ४०, सफरचंदाचे २६ वाण आयात करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे जगभरातील विविध फळांचे वाण भारतात आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. युरोप आणि अमेरिकेतून द्राक्षाचे ४०, सफरचंदाचे २६ वाण आयात करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

भारतीय कृषी संशोधन परिषेदेच्या पुणे जिल्ह्यातील संशोधन संस्थांच्या बैठकीनिमित्त डॉ. सिंग पुण्यात आले होते.  या वेळी डॉ. सिंग म्हणाले, ‘‘भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने देशाच्या विविध भागांत विविध पिकांवर आणि नवनवीन वाणांच्या विकासावर संशोधन सुरू आहे. 

देशातील शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता, त्यांना नवनवीन पिकाबरोबर प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाकडे आकर्षित करण्यासाठी देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील मागणीनुसार नवीन वाण देण्याची गरज आहे. युरोप आणि अमेरिकेतून वाईन आणि खाण्याच्या द्राक्षांचे ४० वाण आयात करण्याची प्रक्रिया अंतिम टप्पात आली आहे. 

युरोप आणि अमेरिकेतून वाईन आणि खाण्याच्या द्राक्षांचे ४० वाण आयात करण्याची प्रक्रिया अंतिम टप्पात आली आहे. यासाठी भारताने या वाणांसाठी काही कोटींचे स्वामित्व हक्क शुल्क खर्च केले आहे. द्राक्षांसह सफरचंदाची २६ आणि पेअरच्या काही वाणांचा समावेश आहे.’’ 

‘‘या वाणांची आयात झाल्यानंतर भारतातील हवामान विभागांनुसार यांच्या चाचण्या शेतकऱ्यांच्या सहभागातून घेतल्या जाणार आहेत. कोणत्या हवामानात कोणते वाण चांगले उत्पादन देते याचा अभ्यास झाल्यानंतर हे वाण त्या त्या भागांसाठी शिफारस केली जाणार आहे. द्राक्षासाठी पुण्यातील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था काम करणार आहे. हे वाण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगले पर्याय ठरतील. तर जे शेतकरी इतर पिकांकडून द्राक्ष पिकांकडे आकर्षित होण्यासही मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नदेखील दुप्पट होण्यास मदत होणार आहे,’’ असेही डॉ. सिंग यांनी सांगितले.

अंजिराचे कॅलिफोर्निया गोल्डन, मिशन वाण लालफितीत
अंजीर प्रक्रिया उद्योगासाठी सुक्या अंजिरासाठी कॅलिफर्निया ‘गोल्डन'' आणि ‘मिशन'' या दोन वाणांसाठी पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे गेल्या वर्षी मागणी केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव दिल्ली दरबारी लालफितीत अडकला असून, या वाणांसाठी देखील अधिक प्रयत्न होणे आवश्‍यक असल्याचे यासाठीचा पाठपुरावा करणारे अंजीर उत्पादक संघाचे सदस्य रोहन उरसळ यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...
साखर कारखान्यांना लवकरच ‘पॅकेज’मुंबई ः राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना...
कमी दरात तूर घेऊन विकली हमीभावाने; दोन...यवतमाळ ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दरात...
सेंद्रिय भाजीपाल्याला तयार केले ‘...झुलपेवाडी (जि. कोल्हापूर) येथील चिकोत्रा सेंद्रिय...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...