लासूर (ता. चोपडा, जि.
बातम्या
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए. के. सिंग
पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे जगभरातील विविध फळांचे वाण भारतात आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. युरोप आणि अमेरिकेतून द्राक्षाचे ४०, सफरचंदाचे २६ वाण आयात करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.
पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे जगभरातील विविध फळांचे वाण भारतात आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. युरोप आणि अमेरिकेतून द्राक्षाचे ४०, सफरचंदाचे २६ वाण आयात करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.
भारतीय कृषी संशोधन परिषेदेच्या पुणे जिल्ह्यातील संशोधन संस्थांच्या बैठकीनिमित्त डॉ. सिंग पुण्यात आले होते. या वेळी डॉ. सिंग म्हणाले, ‘‘भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने देशाच्या विविध भागांत विविध पिकांवर आणि नवनवीन वाणांच्या विकासावर संशोधन सुरू आहे.
देशातील शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता, त्यांना नवनवीन पिकाबरोबर प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाकडे आकर्षित करण्यासाठी देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील मागणीनुसार नवीन वाण देण्याची गरज आहे. युरोप आणि अमेरिकेतून वाईन आणि खाण्याच्या द्राक्षांचे ४० वाण आयात करण्याची प्रक्रिया अंतिम टप्पात आली आहे.
युरोप आणि अमेरिकेतून वाईन आणि खाण्याच्या द्राक्षांचे ४० वाण आयात करण्याची प्रक्रिया अंतिम टप्पात आली आहे. यासाठी भारताने या वाणांसाठी काही कोटींचे स्वामित्व हक्क शुल्क खर्च केले आहे. द्राक्षांसह सफरचंदाची २६ आणि पेअरच्या काही वाणांचा समावेश आहे.’’
‘‘या वाणांची आयात झाल्यानंतर भारतातील हवामान विभागांनुसार यांच्या चाचण्या शेतकऱ्यांच्या सहभागातून घेतल्या जाणार आहेत. कोणत्या हवामानात कोणते वाण चांगले उत्पादन देते याचा अभ्यास झाल्यानंतर हे वाण त्या त्या भागांसाठी शिफारस केली जाणार आहे. द्राक्षासाठी पुण्यातील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था काम करणार आहे. हे वाण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगले पर्याय ठरतील. तर जे शेतकरी इतर पिकांकडून द्राक्ष पिकांकडे आकर्षित होण्यासही मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नदेखील दुप्पट होण्यास मदत होणार आहे,’’ असेही डॉ. सिंग यांनी सांगितले.
अंजिराचे कॅलिफोर्निया गोल्डन, मिशन वाण लालफितीत
अंजीर प्रक्रिया उद्योगासाठी सुक्या अंजिरासाठी कॅलिफर्निया ‘गोल्डन'' आणि ‘मिशन'' या दोन वाणांसाठी पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे गेल्या वर्षी मागणी केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव दिल्ली दरबारी लालफितीत अडकला असून, या वाणांसाठी देखील अधिक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे यासाठीचा पाठपुरावा करणारे अंजीर उत्पादक संघाचे सदस्य रोहन उरसळ यांनी सांगितले.
- 1 of 1503
- ››