400 to 1550 per quintal of tomatoes in the state
400 to 1550 per quintal of tomatoes in the state

राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५० रुपये

राज्यातीलबाजार समित्यांमध्येआवक झालेल्या टोमॅटोलाप्रतिक्विंटल ४०० ते १५५० रुपये दर मिळाला.

औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ९) टोमॅटोची १७२ क्विंटल आवक झाली. ३०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळालेल्या टोमॅटोला सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये २ सप्टेंबरला १२७ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे सरासरी दर २७५ रुपये प्रतिक्विंटल राहिले. चार सप्टेंबरला टोमॅटोची ११८ क्‍विंटल आवक झाली. या टोमॅटोचे सरासरी दर ४५० रुपये प्रतिक्विंटल होते. पाच सप्टेंबरला ११७ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी ३५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. ६ सप्टेंबरला ७८ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचा सरासरी दर ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ७ सप्टेंबरला टोमॅटोची आवक १३ क्विंटल, तर सरासरी दर ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ८ सप्टेंबरला ११२ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नाशिकमध्ये सरासरी प्रतिक्विंटल ५५० रुपये  नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ८) टोमॅटोची आवक ४९,२८० क्विंटल  झाली. त्यामध्ये २,४६,२५० क्रेटचा लिलाव झाला. २० किलोच्या प्रतिक्रेटला किमान ५१ ते कमाल २३१ रुपये असा तर सरासरी दर १११ रुपये होते. ५,५८६ शेतकरी यादिवशी माल घेऊन विक्रीसाठी आल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. ७) आवक २,१७,०१५ क्रेट झाली. त्यास ४१  ते १७५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९५ रुपये होता. सोमवारी (ता. ६) आवक १,७९,८७५ क्रेट झाली. त्यास ३१ ते १५१ दर मिळाला. सर्वसाधारण दर ८१ रुपये राहिला. रविवारी (ता. ५) आवक १,५९,८८० क्रेट झाली. त्यास २१ ते १३१ दर मिळाला. सर्वसाधारण दर ६१ रुपये राहिला. शनिवारी (ता. ४) आवक २,३०,४१५ क्रेट झाली. त्यास २१ ते १४१ दर मिळाला. सर्वसाधारण दर ५१ रुपये राहिला. शुक्रवारी (ता. ३) आवक १,२८,३५५ क्रेट झाली. त्यास ४१ ते २३५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १०१ रुपये राहिला. गुरुवारी (ता. २) आवक २,२५,४७० क्रेट झाली. त्यास प्रतिक्रेट ३१ ते १९१ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७१ रुपये राहिला. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात टोमॅटो लागवड वाढत जाते. गतवर्षीच्या तुलनेत आवक दुपटीने होत असल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र सप्ताहात थोडी सुधारणा होत असल्याचे दिसून आले.

सांगलीत प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये सांगली ः येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. ९) टोमॅटोची ३०० क्रेटची (एक क्रेट २० ते २३ किलोचे) आवक झाली होती. टोमॅटोस प्रति दहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. शिवाजी मंडईत सांगली जिल्ह्यातील वाळवा, कवठेपिरान, तुंग, मिरज यासह विटा तालुक्यातून टोमॅटोची आवक होते. बुधवारी (ता. ८) टोमॅटोची २७० क्रेटची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १२० ते १७० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. ७) टोमॅटोची ३१५ क्रेटची आवक झाली होती. टोमॅटोस प्रति दहा किलोस १०० ते १३० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. ६) टोमॅटोची ३०० क्रेटची आवक झाली होती. टोमॅटोस प्रति दहा किलोस १०० ते १३० रुपये असा दर मिळाला. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर प्रति दहा किलोस ५० ते ६० रुपये असे दर होते, अशी माहिती व्यापारी वर्गाने दिली.

पुण्यात प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ९) टोमॅटोची सुमारे ७ हजार क्रेट आवक झाली होती. या वेळी दहा किलोला ५० ते १०० रुपये दर होता. तर जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारातील टोमॅटोच्या खुल्या बाजारात बुधवारी (ता. ८) सुमारे १२ हजार क्रेट आवक झाली होती. यावेळी २० किलोच्या क्रेटला ५० ते १५० रुपये दर होता. पुणे बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या मागणीत वाढत असून, दरात देखील सुधारणा होत असल्याचे ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन दिवसांत किलो मागे २ ते ३ रुपयांनी दर वाढ होत असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

कळमना बाजारात १२०० रुपये प्रतिक्विंटल  नागपूर : आठवडाभरापूर्वी ४०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल असलेल्या टोमॅटोच्या दरात तेजी अनुभवली जात आहे. कळमना बाजार समितीत टप्प्याटप्प्याने टोमॅटो दरात वाढ नोंदविण्यात आली. मध्यंतरीच्या काळात टोमॅटोचे व्यवहार ६०० ते ९०० रुपयांनी झाले. त्यानंतर ८०० ते १००० रुपये असा दर टोमॅटोला मिळाला. गुरुवारी हेच दर १००० ते १२०० रुपयांवर पोहोचले होते. दर कमी असताना आवक देखील कमी होती, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. आता दरात तेजी आली असतानाच आवक देखील १०० क्विंटलवरून २०० क्विंटलवर पोहोचली आहे. ग्राहकांची मागणी आणि बाजारपेठेचा कल लक्षात घेऊन दरातील चढ-उतार होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. नागपूरसह लगतच्या मध्य प्रदेशातील काही शेतकऱ्यांकडून बाजारात टोमॅटोचा पुरवठा होतो. टोमॅटोची किरकोळ विक्री ३० रुपये किलो प्रमाणे होत आहे.

परभणीत प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये  परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे- भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ९) टोमॅटोची ३००० हजार क्रेट (६०० क्विंटल) आवक होती. टोमॅटोला प्रतिक्रेट किमान १०० ते कमाल २०० तर सरासरी १५० रुपये (प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल १००० रुपये तर सरासरी ७५० रुपये) दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील भाजीपाला उत्पादक गावातून तसेच औरंगाबाद, लातूर जिल्ह्यांतील वडवळ येथून टोमॅटोची आवक होत आहे. गेल्या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी १००० ते ४००० क्रेटची (२०० ते ८०० क्विंटल) आवक झाली. त्या वेळी प्रतिक्रेट १०० ते ३०० रुपये (प्रतिक्विंटल ५०० ते १५००) रुपये दर मिळाले. गुरुवारी घाऊक विक्रीचे दर ५०० ते १००० रुपये क्विंटल होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो २० ते ४० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

अकोल्यात प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये  अकोला ः येथील भाजी बाजारात गुरुवारी (ता. ९) टोमॅटोची ८० ते १२० रुपये प्रतिक्रेट (२० किलोचा एक क्रेट) दराने सरासरी विक्री झाली. स्थानिकसह राज्याच्या इतर भागातून येथील बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर घसरले आहेत. बाजारात सुमारे १००० क्रेटची आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  या आठवड्यात सतत पाऊस होत असल्याने टोमॅटोला फटका बसला आहे. दुय्यम दर्जाचा टोमॅटो तुलनेने अधिक प्रमाणात विक्रीला येत आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून टोमॅटोचे दर घसरलेले असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आवक अधिक असून तुलनेने उठाव कमी झालेला आहे. त्यातच सलग पावसामुळे बाजारांवरही परिणाम झाला. यामुळे दर कमी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. टोमॅटोच्या एका क्रेटचे वजन १८ ते २० किलो असते. या क्रेटला सरासरी १०० रुपयांपर्यंत गुरुवारी दर मिळाला. टोमॅटोची किरकोळ विक्री १५ ते २० रुपये किलोने केली जात होती.

नांदेडला प्रतिक्विंटल ६०० ते ८०० रुपये  नांदेड : नांदेड शहरातील इतवारा व तरोडानाका बाजारात सध्या टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्यामुळे टोमॅटोला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. नांदेड शहरात सध्या टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरातील इतवारा तसेच तरोडानाका भागांमध्ये भरणाऱ्या होलसेल बाजारात दररोज पाच ते आठ टन टोमॅटोची आवक होत आहे. या टोमॅटोला सध्या सहाशे ते आठशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. टोमॅटोचे दर पडल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बाजारात मागील एक महिन्यापासून टोमॅटोचे दर कोसळले आहेत. अशातच आवक वाढल्यामुळे त्याचा दरावर विपरीत परिणाम झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तर किरकोळ बाजारात दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे टोमॅटोची विक्री होत असल्याचे व्यापारी अफसर खान यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com