चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात नियुक्त्या

agriculture department
agriculture department

पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरळसेवा भरतीने व पदोन्नतीने हे सर्व अधिकारी राज्य सरकारच्या सेवेत दाखल झाले आहेत. यामध्ये वर्ग ‘अ’चे १७, वर्ग ‘ब’ ८३ अधिकारी तर २९९ वर्ग ‘ब’ मधील कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील रिक्त पदी नियुक्त्या करण्यात आल्याने कृषी विभागाच्या कामाला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शासनाचे अवर सचिव अ. नि. साखरकर यांनी सोमवारी (ता. १७) शासन निर्णय काढत सरळसेवेने नियुक्ती देण्याबाबत आदेश काढले आहेत. यामध्ये औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक या महसुली विभागात प्रामुख्याने नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये वर्ग ‘अ’च्या १७ अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्ग ‘ब’च्या ८३ अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. याच दिवशी कनिष्ठ स्तर अधिकाऱ्यांची २९९ जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे कृषी विभागाच्या कामांना काही प्रमाणात गती मिळणार आहे. गावपातळीवरील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचणारा कृषी विभाग हा एकमेव विभाग आहे. या विभागात ३९९ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याने काही अधिकाऱ्यांकडे दिलेल्या अतिरिक्त पदांचा भार कमी होणार आहे. राज्यात सर्वाधिक मनुष्यबळ असलेल्या कृषी विभागात अनेक वर्षांपासून नोकर भरती झाली नव्हती. पण आता ती सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. वर्गनिहाय विविध पदांवरील नियुक्त्या वर्ग ‘अ’ ः कृषी उपसंचालक, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, प्रकल्प उपसंचालक या पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.  गट ‘ब’ ः तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, मोहीम अधिकारी. तसेच २९९ कनिष्ठ स्तर अधिकाऱ्यांना मंडल कृषी अधिकारी, कृषी अधिकारी यावर पदस्थापना देण्यात आल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com