agriculture news in Marathi 400 officers appointed in agriculture department Maharashtra | Agrowon

चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात नियुक्त्या

टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरळसेवा भरतीने व पदोन्नतीने हे सर्व अधिकारी राज्य सरकारच्या सेवेत दाखल झाले आहेत. यामध्ये वर्ग ‘अ’चे १७, वर्ग ‘ब’ ८३ अधिकारी तर २९९ वर्ग ‘ब’ मधील कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील रिक्त पदी नियुक्त्या करण्यात आल्याने कृषी विभागाच्या कामाला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरळसेवा भरतीने व पदोन्नतीने हे सर्व अधिकारी राज्य सरकारच्या सेवेत दाखल झाले आहेत. यामध्ये वर्ग ‘अ’चे १७, वर्ग ‘ब’ ८३ अधिकारी तर २९९ वर्ग ‘ब’ मधील कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील रिक्त पदी नियुक्त्या करण्यात आल्याने कृषी विभागाच्या कामाला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाचे अवर सचिव अ. नि. साखरकर यांनी सोमवारी (ता. १७) शासन निर्णय काढत सरळसेवेने नियुक्ती देण्याबाबत आदेश काढले आहेत. यामध्ये औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक या महसुली विभागात प्रामुख्याने नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये वर्ग ‘अ’च्या १७ अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्ग ‘ब’च्या ८३ अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. याच दिवशी कनिष्ठ स्तर अधिकाऱ्यांची २९९ जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामुळे कृषी विभागाच्या कामांना काही प्रमाणात गती मिळणार आहे. गावपातळीवरील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचणारा कृषी विभाग हा एकमेव विभाग आहे. या विभागात ३९९ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याने काही अधिकाऱ्यांकडे दिलेल्या अतिरिक्त पदांचा भार कमी होणार आहे. राज्यात सर्वाधिक मनुष्यबळ असलेल्या कृषी विभागात अनेक वर्षांपासून नोकर भरती झाली नव्हती. पण आता ती सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

वर्गनिहाय विविध पदांवरील नियुक्त्या
वर्ग ‘अ’
ः कृषी उपसंचालक, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, प्रकल्प उपसंचालक या पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. 
गट ‘ब’ ः तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, मोहीम अधिकारी. तसेच २९९ कनिष्ठ स्तर अधिकाऱ्यांना मंडल कृषी अधिकारी, कृषी अधिकारी यावर पदस्थापना देण्यात आल्या आहेत.
 

 


इतर बातम्या
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...