नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळाली ४०६ कोटी रुपयांची मदत

नांदेड : जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मिळालेले ४२४ कोटी एक लाख रुपयांचे अनुदान नांदेड जिल्हा बँकेकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी जिल्ह्यातील सात लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४०६ कोटी १४ लाख रुपये वर्ग करण्यात आले, अशी माहिती बँक प्रशासनाने दिली.
 406 crore relief for flood victims in Nanded district

जिल्हा बँकेचे मुख्य अधिकारी अजय कदम म्हणाले, ‘‘शाखांमध्ये होणारी गर्दी व त्यातून शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने खातेधारक शेतकऱ्यांना एटीएम कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बँकेतील कर्मचाऱ्यांनी गावोगावी जाऊन बँक खातेधारक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना एटीएम कार्ड देण्याचे काम केले. दरम्यान धर्माबाद तालुक्यातील शाखांतील शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या व अनुदान रक्कमेचा धनादेश उशिराने मिळाला. त्यामुळे ती गावे वगळता इतर सर्व गावांच्या याद्या अद्ययावत करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली.’’

‘‘बँकेमार्फत ज्या शेतकऱ्यांना एटीएम कार्ड मिळाले आहे, त्यांनी खात्यांतून रक्कम उचलली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये सोमवारपासून (ता. ६) रक्कम जमा करण्याचे काम सुरु झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यांत रक्कम जमा झालेली नाही, त्यांच्या खात्यांत बँक लवकरात लवकर रक्कम जमा करेल. काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा. एटीएमचा वापर करून बॅंकेतील अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com