नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
ताज्या घडामोडी
बाळापुरात आढळले ४१ पक्षी मृतावस्थेत
अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील नकाशी येथे तलावात ४१ पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या मेलेल्या पक्ष्यांचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेत पाठविण्यात आले.
अकोला : जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील नकाशी येथे तलावात ४१ पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या मेलेल्या पक्ष्यांचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल येईपर्यंत नकाशी येथील तलावाचा दहा किलोमीटर परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या बाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश काढले आहेत.
जिल्ह्यात यापूर्वी मूर्तिजापूर, अकोला तालुक्यात पक्षी मृत आढळून आलेले आहेत. प्रशासनाने आजवर घेतलेल्या नमुन्यांपैकी जितके अहवाल आले ते नकारात्मक आहेत. अकोला तालुक्यातील मौजे चाचोंडी येथील डॉ. चिकटे यांच्या फार्म हाऊस मध्ये दोन पक्षी मृत आढळले होते. या पक्ष्यांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर या पक्ष्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
परिणामी चाचोंडी येथे डॉ. चिकटे यांच्या फार्म हाऊसपासून दहा किलोमीटर त्रिज्या परिसरात लागू केलेले सतर्क क्षेत्र घोषित करण्याबाबतचे आदेश रद्द मागे घेण्यात आले आहेत. बर्ड फ्लू नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय ‘वॉर रूम’
जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या संसर्गाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय वॉररूम तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावने व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी यांनी दिली आहे. या वॉररूममध्ये पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बर्ड फ्लू व तत्संबंधी घटनांवर येथून नियंत्रण ठेवणे, तत्काळ क्षेत्रीय उपाययोजना करणे, पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाशी संपर्कात राहण्याचे काम केले जात आहे.
- 1 of 1057
- ››