राज्यातील ४१ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

cane chrushing
cane chrushing

कोल्हापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, राज्यातील ४१ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. औरंगाबाद विभागातील सर्वाधिक १२ साखर कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. त्यानंतर नगर जिल्ह्यातील ८ कारखान्यांचे गाळप बंद झाले.   १० मार्चअखेर उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यातील कारखान्यांनी ४९२ लाख टन उसाचे गाळप झाले असून सरासरी ११.१२ च्या उताऱ्याने ५४७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. येत्या पंधरा दिवसांत राज्यातील बहुतांशी साखर कारखाने बंद होण्याची शक्‍यता असल्याचे साखर आयुक्तालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. पश्‍चिम महाराष्ट्रात अजूनही उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून राज्यात सर्वात शेवटपर्यंत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर हंगाम चालण्याची शक्‍यता आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील साखर कारखाने बंद होण्यास वेग आला आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूर विभागातील प्रत्येक पाच साखर कारखान्यांनी गळीत हंगाम पूर्ण केला. नगरमधील आठ, नांदेडमधील चार, तर अमरावती विभागातील दोन साखर कारखाने बंद झाले आहे.  राज्यात इतरत्र दुष्काळामुळे उसाचे उत्पादन कमी झाले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात महापुरामुळे सुरुवातीच्या टप्प्यात उसाचे गाळप कमी होइल अशी शक्‍यता होती. परंतु, फेब्रुवारीनंतर ज्या प्रमाणात गाळपामध्ये गती अपेक्षित होती. तितकी गती दिसून आली नाही. यामुळे अद्याप बहुतांशी ठिकाणी ऊस तसाच शिल्लक आहे. अनेक मातब्बर कारखान्यांचा दहा ते पंधरा टक्के ऊस शिल्लक असल्याने हे कारखाने आणखी पंधरा दिवसापर्यंत चालू शकतील असा अंदाज कारखान्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. उताऱ्यात कोल्हापूर अव्वल मार्चच्या मध्यापर्यंत कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यात आघाडी कायम ठेवली आहे. या कालावधीपर्यंत साखर उतारा १२ टक्क्‍यांहून अधिक राहिला आहे. कोल्हापूर खालोखाल पुणे विभागाचा साखर उतारा ११.१६ राहिला. नागपूर विभाग उताऱ्याच्या प्रमाणात सर्वांत शेवटी आहे. नागपूरचा सरासरी उतारा ९.७० टक्के इतका नोंदविला गेला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com