अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकी

राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४ लाख टन ऊस गाळला आहे. मात्र गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध आहे.
Sugar Factory
Sugar Factory

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४ लाख टन ऊस गाळला आहे. मात्र गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  राज्यात यंदा १८२ कारखान्यांनी धुराडी पेटवली आहेत. यात ९२ सहकारी आणि ९० खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ५३८ लाख टन ऊस गाळून ५२४ लाख क्विंटल साखर तयार करण्यात आली आहे. उतारा ९.७२ टक्के मिळतो आहे.  कोल्हापूर विभागातील ३७ कारखान्यांनी १२५.९२ लाख टन ऊस गाळून १४२.६७ लाख क्विंटल साखर तयार केला आहे. कोल्हापूरचा उतारा राज्यात सर्वाधिक असून, तो ११.३३ टक्के आहे. गाळपात दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग असून, ३० कारखान्यांनी ११७.६९ लाख टन गाळप केले आहे.  पुणे विभागात १०.०९ टक्के उतारा ठेवत आतापर्यंत ११८.७९ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सोलापूर विभाग असून, ११७.६९ लाख टन ऊस गाळून साखर उत्पादन १०७.२५ लाख क्विंटलवर नेले आहे. उतारा तेथे ८.९४ टक्के मिळतो आहे.  नगरमधील २५ कारखान्यांनी ८.९३ टक्के उतारा ठेवत ७०.७८ लाख क्विंटल साखर तयार केली. या कारखान्यांनी आतापर्यंत ७९.२४ लाख टन उसाचे गाळप केले.

विदर्भ, मराठवाड्यात हंगाम जोरात दुष्काळी औरंगाबाद भागात आतापर्यंत २१ कारखान्यांनी ४५.३१ लाख टन ऊस गाळला. तेथे ३८.७९ लाख क्विंटल साखर तयार होऊन ८.५६ टक्के उतारा मिळाला आहे. नांदेड विभागात २४, अमरावतीला दोन, तर नागपूर भागात यंदा तीन साखर कारखाने चालू आहेत. नांदेडला आतापर्यंत ऊसगाळप ४४.४८ लाख टन (साखर ४१.५ लाख क्विंटल व उतारा ९.३३ टक्के), अमरावतीला गाळप ४.०५ लाख टन (साखर ३.४१ लाख क्विंटल व उतारा ८.४२ टक्के) तर नागपूरचे ऊसगाळप १.७९ लाख टनांवर पोहोचले आहे. तेथे ८.४४ टक्के उतारा ठेवत १.५१ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. 

प्रतिक्रिया यंदा गाळपाचा आकडा ९५० लाख टनांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत राज्यातील ८० टक्के गाळप पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या दोन महिन्यांत उर्वरित २० टक्के ऊस गाळला जाईल. मात्र निवडक कारखान्यांची धुराडी एप्रिल-मेपर्यंत चालू राहतील.  - पांडुरंग शेळके, सहसंचालक (विकास), साखर आयुक्तालय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com