agriculture news in Marathi, 415 tankers for water supply in pune division, Maharashtra | Agrowon

पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मार्च 2019

पुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील तब्बल ४५ तालुक्यांपैकी ३० तालुक्यांत टंचाईच्या झळानी ग्रासले आहे. विभागातील ३८३ गावे २६६० वाड्यांमधील टंचाई भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी ४१५ टॅंकर सुरू करावे लागले आहेत. विभागातील आठ लाखांहून अधिक लोकसंख्येला तर ४४ हजार जनावरांना टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पाणीपुरवठ्यासाठी २२३ विहिरी आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 

पुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील तब्बल ४५ तालुक्यांपैकी ३० तालुक्यांत टंचाईच्या झळानी ग्रासले आहे. विभागातील ३८३ गावे २६६० वाड्यांमधील टंचाई भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी ४१५ टॅंकर सुरू करावे लागले आहेत. विभागातील आठ लाखांहून अधिक लोकसंख्येला तर ४४ हजार जनावरांना टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पाणीपुरवठ्यासाठी २२३ विहिरी आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 

पाण्याचा उपसा वाढल्याने भूजल पातळी सातत्याने कमी होत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्राेत असलेल्या विहिरी, बोअरवेल कोरडे पडले. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पाणीटंचाई असून, समारे २ लाख ४५ हजार, सांगलीतील सुमारे २ लाख ५० हजार, साताऱ्यातील जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७७ हजार, पुणे जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार लोकसंख्येला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. जत तालुक्यातील सर्वाधिक १ लाख ६४ हजार तर माण तालुक्यातील मधील १ लाख ६ हजार नागरिकांना टंचार्इच्या झळा बसत आहे. तर सातारा जिल्ह्यातील ४३ हजार ८७६ जनावरांनाही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील टंचाई भीषण झाल्याने ११५ गावे ३९७८६२ वाड्यांना ११७ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर सांगली जिल्ह्यातही टंचाईची तीव्रता वाढली असून, ११५ गावे ७८२ वाड्यांना ११० टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. साताऱ्यातील ९३ गावे १०५ वाड्यांना १०५ टॅंकरने, तर पुणे जिल्ह्यातील ४८ गावे ५३५ वाड्यांमध्ये ८३ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. सांगलीतील जत तालुक्याच्या सर्वाधिक पाणीटंचाई असून, तेथील ६३ गावे ४९६ वाड्यांना ६८ टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे, तर माण, आटपाडी, सांगोला तालुक्यांमध्येही टंचाई चांगलीच वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अद्यापही टंचाई भासत नसल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. 

टंचाईग्रस्त भागात सुरू असलेल्या टॅंकरची तालुकानिहाय संख्या :

  •   पुणे - बारामती २२, शिरूर १७, आंबेगाव १२, दौंड ९, पुरंदर ९, खेड ४, जुन्नर ३, इंदापूर २, हवेली २.
  •    सातारा - माण ६४, कारेगाव १७, खटाव १४, फलटण ३, वाई २, खंडाळा १.
  •   सांगली - जत ६८, आटपाडी २१, कवठेमहांकाळ ८, खानापूर ८, तासगाव ३.
  •    सोलापूर - सांगोला २१, मंगळवेढा ४१, करमाळा १७, दक्षिण सोलापूर १०, माढा ७, माळशिरस ७, मोहोळ ४, माळशिरस ७, उत्तर सोलापूर ४, अक्कलकोट ३, बार्शी ३. 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...