वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२ जनावरे; नगर जिल्ह्यातील घटना

पावसाळ्याच्या सुरवातीला शेती बांध तसेच मोकळ्या रानात उगवून आलेल्या वनस्पतींचा जनावरांच्या आहारात समावेश करू नये. पशूपालकांनी नायट्रेटचे प्रमाण असलेल्या वनस्पती, गवत जास्त प्रमाणात जनावरांच्या खाद्यामध्ये देऊ नयेत यासाठी पशूसंवर्धन विभागाकडून जागृती केली जात आहे. - डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, नगर
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२ जनावरे; नगर जिल्ह्यातील घटना
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२ जनावरे; नगर जिल्ह्यातील घटना

नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात येणाऱ्या वनस्पतींचा वापर जनावरांच्या खाद्यात जास्त प्रमाणात झाल्याने नायट्रेटची विषबाधा होऊन जिल्ह्यात आत्तापर्यंत ४२ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. या वनस्पतींचे खोड आणि मुळामध्ये नायट्रेटचे प्रमाण असते. त्यामुळे ही जनावरे जनावरे दगावली असल्याचे जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. कोपरगाव, पाथर्डी, संगमनेर, नगर, नेवासे आणि पारनेर तालुक्‍यातील जनावरांचा यात समावेश आहे. पशूसंवर्धन विभागाने वेळीच उपचार केल्याने या विषवाधेतून सुमारे शंभर जनावरे वाचली आहेत. पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात कुंद्रा (कुंदुरचा, कुंजीर), माठ (रानमाठ, काटेमाठ), रताळे भाजी, केणा, ढोल आंबा, कोंबडा गवत या सारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढतात. या वनस्पतीचे खोड आणि मुळामध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असते. काही शेतकरी कोवळ्या गवतासोबत या वनस्पती पूर्णपणे उपटून जनावरांना चारा म्हणून वापरतात. त्यामुळे यातील नायट्रेटची वीषबाधा होऊन जनावरे दगावत असल्याचा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला.  नगर तालुक्‍यातील वडगाव तांदळी, राळेगण, आंबिलवाडी येथील आठ जनावरे, पाथर्डी तालुक्‍यातील चारा छावणीतील एक जनावर, नेवासे तालुक्‍यातील कुकाणा येथील सात जनावरे, कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे पाच, राहाता तालुक्‍यातील अस्तगाव येथील एक जनावर, संगमनेर तालुक्‍यातील नऊ जनावरे, पारनेर तालुक्‍यातील रांजणगाव मशिद, बांबुर्डी, चौंभूत येथील तीन अशी आत्तापर्यंत एकूण ४२ जनावरे नायट्रेटचा अंश असलेल्या वनस्पती खाल्ल्याने दगावल्याचे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील पशूतज्ज्ञांनी सांगितले आहे. मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने जवळपास १०० जनावरे बचावली आहेत. पशूपालकांनी नायट्रेटचे प्रमाण जास्त असलेल्या वनस्पती खोड, मुळासकट जनावरांच्या आहारात देऊ नयेत, यासाठी पशूसंवर्धन विभागाकडून जागृती केली जात आहे.  कशामुळे होते विषबाधा : बांधावर येणाऱ्या कुंजीर, रानमाठ, रताळे भाजी, केणा, ढोल आंबा या वनस्पतींचे खोड आणि मुळात नायट्रेटचे प्रमाण असते. त्यामानाने पानांमध्ये कमी असते. या वनस्पती जास्त प्रमाणात जनावरांच्या आहारात आल्यातील त्यातील नायट्रेट रक्तात जलद गतीने शोषले जाते. त्यामुळे ऑक्‍सिजन वाहून नेण्याची रक्ताची क्षमता कमी होते. परिणामी हृदय व फुप्फुसे निकामी होऊन जनावरांचा मृत्यू होतो.  असे करा उपचार 

  • जनावरांना जास्त प्रमाणात बांधावरील वनस्पती, कोवळे गवत खाऊ घालू नये.
  • हिरवे गवत कापताना साधारण सहा इंच खोडापासून अंतर ठेवून कापावे. हिरव्या गवतासोबत कोरडा चारा किंवा इतर चारा कुट्टी करून द्यावा. 
  •  एखाद्या चारा पिकाला युरिया खत दिल्यानंतर लगेच ते जनावरांना खायला देऊ नये.
  • कळपात विषबाधेची लक्षणे दिसताच ताबडतोब संबंधित चारा, गवत देणे बंद करावे
  • विषबाधेची लक्षणे 

  • जनावरे लाळ गाळतात, स्नायूंमध्ये कंप होतो, पोट दुखते, जुलाब होतात.
  • अशक्तपणा येतो. तोंड व डोळ्यांची आंतरत्वचा चॉकलेटी किंवा निळी पडते.
  • जनावरे तोंडाने श्वास घेतात, रक्त चॉकलेटी होते, जनावरे कोमात जाऊन त्यांचा मृत्यू होतो.
  • सुरवातीची लक्षणे न दिसता जनावरे अचानक ओरडून जमिनीवर आडवी पडतात.  विषबाधेसाठी नुकसानीसाठी तरतूद करा... काटेमाट वनस्पती खाण्यात आल्याने माझ्या चार कालवडी आणि एक गाय यामुळे मृत्युमुखी पडल्या, उपचारामुळे चार जनावरे वाचविण्यात यश आले. पंचनामा झाला असून, माझे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जनावरांच्या विषबाधेकरिता कोणतीही तरतूद नसल्याचे समजले, परंतू, कोणताही शेतकरी जनावरांना विषारी वनस्पती खाऊ घालणार नाही. सरकारने शहानिशा करून याकरिता तरतूद करावी, आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. - उद्धव जाधव, शेतकरी, टाकळी, ता. कोपरगाव, जि. नगर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com