पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४२ कोटींचे नुकसान

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४२ कोटींचे नुकसान
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४२ कोटींचे नुकसान

पुणे : गेल्या जुलै व ऑगस्ट महिन्यांत अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान पातळी ओलांडलेली शेती पिके, फळपिकांचे तसेच शेतजमिनीचे मिळून एकूण १६ हजार ३१६ हेक्टरवर क्षेत्राला फटका बसला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील ४७ हजार २४७ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून हे सुमारे ४२ कोटी रुपये असल्याचे पंचनाम्यातून समोर आले आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना पुणे जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीबाबतचा अहवाल नुकताच सादर केला आहे. त्यामधून ही माहिती स्पष्ट झालेली आहे.

जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित तयार केलेला हा अहवाल आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जिरायत क्षेत्रावरील बाधित बारा हजार ९७ हेक्टर पिके, बागायती क्षेत्रावरील बाधित पिके चार हजार १२७ हेक्टर तर फळपिकांखाली ९१ हेक्टर मिळून सुमारे सोळा हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही रक्कम ४१ कोटी ८८ लाख ७८ हजार रुपये होत आहे. 

या शिवाय दुसऱ्या वर्गात शेजजमिनीच्या नुकसानीपोटीही मदत दिली जाते. ज्यामध्ये शेतजमीन वाहून जाणे, माती येऊन साचणे, वरचा थर वाहून जाणे, बांध फुंटणे अशा प्रकारच्या नुकसानीचा समावेश आहे. जिल्ह्यात शेतजमिनीच्या नुकसानीचे क्षेत्र ६०५.६० हेक्टर इतके झालेले आहे. त्यासाठी सुमारे ८० लाख ९६ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. म्हणजेच एकूण ४२ कोटी ६९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांनी दिली.

भात, ऊस, बटाटा, भाजीपाल्याचे सर्वाधिक नुकसान     

जिल्ह्यात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले पीकनिहाय क्षेत्राचीही माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये जिरायती पिकांमध्ये भात ५९९०.९ हेक्टर, भाजीपाला ३८८.८ हेक्टर, भुईमूग ४८७.९ हेक्टर, बटाटा १७३२ हेक्टर, फुलपिके ६.८ हेक्टर, बाजरी २०२ हेक्टर, वाटाणा १७०६ हेक्टर, घेवडा ३७७.३ हेक्टर, इतर पिके ४५६.२ हेक्टर, सोयाबीन ८४९.१ हेक्टर मिळून बारा हजार ९७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात बागायती पिकांमध्ये ऊस दोन हजार २०३ हेक्टर, भाजीपाला १००७ हेक्टर, भुईमूग १०४ हेक्टर, चारापिके ६८ हेक्टर, इतर पिके १२९ हेक्टर आदींसह ४१२७.८४ हेक्टर तर फळपिकांमध्ये डाळिंब ५३.५ हेक्टर, केळी २१ हेक्टर आदींसह फळपिकांचे मिळून एकूण ९१.१३ हेक्टरवरील पिके बाधित झालेली आहेत.

तालुका क्षेत्र शेतकरी संख्या
भोर १५६९ ५८३०
वेल्हा ४८.८ ५७७ 
मुळशी ६५०.२९ २६६२
मावळ १४६३ ३३५४ 
हवेली १२३४.२१ ५९९३ 
जुन्नर  २३३०.५२ ५९३१ 
आंबेगाव १९९३.३६ ५४२६
खेड २१६४.८१ ६४९७
शिरूर ३३३.५० ७९९
पुरंदर २३१३.७७ ५०६०
बारामती  २८८.२१ ७७०
इंदापूर ६२३.४६ १८१५ 
दौंड  १३०३ २५३३  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com