संत्रा आंबिया बहाराला ४२ कोटींची भरपाई

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबिया बहरातील संत्र्याला ४२.१९ कोटींची विमाभरपाई मंजूर झाली आहे. जिल्ह्यात ११ हजार ९३८ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला होता.
संत्रा आंबिया बहाराला ४२ कोटींची भरपाई
संत्रा आंबिया बहाराला ४२ कोटींची भरपाई

अमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबिया बहरातील संत्र्याला ४२.१९ कोटींची विमाभरपाई मंजूर झाली आहे. जिल्ह्यात ११ हजार ९३८ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला होता. अमरावती जिल्ह्यात ७० हजार हेक्‍टरच्या आसपास संत्रा लागवड क्षेत्र आहे. त्यातील सर्वाधिक क्षेत्र वरुड व मोर्शी तालुक्यात आहे. जिल्ह्यात संत्र्याच्या आंबिया बहारासाठी पंतप्रधान विमा योजना अधिसूचित मंडळात राबविण्यात आली. गेल्यावर्षी अवकाळी पाऊस, परतीचा पाऊस, अतिवृष्टी व गारपिटीमुळे संत्रा बागांचे नुकसान झाले होते. मोसंबी, लिंबू, केळी या फळांनाही नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. मात्र संत्रा वगळता उर्वरित फळपिकांचे क्षेत्र अत्यल्प आहे. त्यातच केवळ संत्रा उत्पादकांनी पंतप्रधान फळ पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. त्यामुळे त्यांना विमाभरपाई मंजूर करण्यात आली आहे.  कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार अमरावती तालुक्यात सात शेतकऱ्यांना २० लाख ९८ हजार ७२३ रुपये, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १९ शेतकऱ्यांना ९ लाख १२ हजार ८३५ रुपये, भातकुली तालुक्यात १४ शेतकऱ्यांना ५ लाख ८ हजार २०० रुपये, चांदुर रेल्वे तालुक्यात १४० शेतकऱ्यांना ३२ लाख ४२ हजार ८५ रुपये, धामणगाव तालुक्यात १२२ शेतकऱ्यांना सहा कोटी ९९ लाख ५६ हजार ४३४ रुपये, चिखलदरा तालुक्यात अकरा शेतकऱ्यांना २ लाख ८५ हजार ८३२ रुपये, तिवसा तालुक्यात २४० शेतकऱ्यांना ७३ लाख ८३ हजार १४५ रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

सर्वाधिक भरपाई मिळालेले तालुके 

तालुका  शेतकरी   मंजूर पीकविमा
अंजनगावसुर्जी  १९८१      ४,२१,७८,०९७
मोर्शी   १८१५    १०,१०,३१,५०७
वरुड ११९७ ११,५६,७५,७५१
अचलपूर   २७४३  ६,९९,५६,४३४
चांदूर बाजार  २८७८    ७,४७,५७,९१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com