गंगापूर धरणात ४२ तर दारणा धरणात ३८ टक्के साठा

गंगापूर धरणात ४२ तर दारणा धरणात ३८ टक्के साठा
गंगापूर धरणात ४२ तर दारणा धरणात ३८ टक्के साठा

नाशिक : जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये आठ दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने गंगापूर आणि दारणा धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. गंगापूर धरणातील साठा ४२ तर दारणा धरणातील साठा ३८ टक्क्यांवर पोचला असून, पुढील चार महिने तरी नाशिकच्या पाण्याची चिंता मिटली आहे.  येत्या आठवडाभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांची पाणीकपातीतून सुटका होण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असला तरी नाशिक शहरासह जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी कमी प्रमाणात आहे. गेल्या वर्षी १० जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये २६ टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र हा साठा १८ टक्क्यांवर आहे. मात्र पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर चांगला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची एकूण क्षमता ६८०० दशलक्ष घनफूट असून सध्या धरणात २३४४ दशलक्ष घनफूट साठा आहे. दारणा धरणाची एकूण क्षमता ६८०० दशलक्ष घनफूट असून सध्या धरणात २७०८ दशलक्ष घनफूट साठा आहे.

नाशिक शहराला गंगापूर धरणातून ३९०० तर दारणातून ४०० असे एकूण ४३०० दशलक्ष घनफूट पाण्याचे ३१ जुलैपर्यंत आरक्षण आहे. सध्या महापालिकेने गंगापूर धरणातून ३८२६ तर दारणा धरणातून ३३० दशलक्ष घनफूट पाणी उचलले आहे. महापालिकेचे दारणातून ७० तर गंगापूरमधून ७४ असे एकूण १४४ दशलक्ष घनफूट पाणी उचलणे शिल्लक आहे. हे पाणी ३१ जुलैपर्यंत पुरणार आहे. येत्या २० दिवसांत धरणातील साठा ५० टक्क्यांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. सध्या धरणातून रोज नऊ ते दहा दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. नाशिक शहरावरील पाणीकपातीचे संकट सध्यातरी टळले अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com