‘कृषी’च्या ४२ योजना आता एका 'टच'वर !

शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात न जाता योजनांची माहिती व्हावी. त्यांना त्या योजनेचे फॉर्मही उपलब्ध व्हावेत, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर योजनांच्या प्रसाराकरिता असे प्रयत्न गरजेचे आहेत. - नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ
42 schemes on one touch
42 schemes on one touch

यवतमाळ : सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत यवतमाळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून योजनांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्हॉट्ॲपवर ‘योजना' किंवा ‘स्कीम' असे टाइप करून पाठविताच तब्बल ४२ योजनांची माहिती मोबाईल स्क्रीनवर उपलब्ध होते.  कोरडवाहू शेती त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकाच पिकावर अवलंबिता वाढीस लागली आहे. विविध कारणांमुळे पिकाच्या उत्पादकतेत घट झाल्यास शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍य वाढून आत्महत्येसारखे प्रकारही घडतात. कृषी तंत्रज्ञान विस्तारात अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे कृषी विभागाला मर्यादा आहेत. मात्र, यावर पर्याय म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळकपर यांनी पुढाकार घेत कृषी विभागाच्या योजनांची माहिती एका मोबाईल टचवर उपलब्ध करून दिली आहे.  तब्बल ४२ योजनांच्या प्रसारासाठी त्यांनी मोबाईलचा अभिनव पद्धतीने उपयोग केला आहे. त्यामध्ये मृद् व जलसंधारणासह, पाणलोट विकास, वसुंधरा, राष्ट्रीय फळबाग अभियान, कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री किसान मानधन, वनशेती, शेततळे, मिनी राइस मिल अशा योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची अमरावती विभागीय आयुक्‍तांकडून देखील दखल घेण्यात आली आहे. 

अशी आहे कार्यपद्धती  आपल्या व्हॉटसॲपवरून ९४०४३९६११९ या क्रमांकावर योजना किंवा स्कीम असे लिहून पाठवावे. त्यानंतर लगेच ४२ योजंनाची माहिती, त्याच्या लाभासाठी लागणारे दस्तऐवज अशी सारी माहिती मोबाईल स्क्रीनवर उपलब्ध होते. ज्या योजनेची माहिती हवी आहे त्याचा कोड परत त्याच क्रमांकावर व्हॉट्सॲप करावा लागतो.  योजनांच्या महितीसाठी संबधित योजनेसमोरील शब्द टाइप करुन 9404396119 या नंबर वर whatsapp करा.

1.सूक्ष्म सिंचन योजना - pmksy टाइप करा. 

2. यांत्रिकीकरण योजनेसाठी- smam  टाइप करा.

3. फळबागेच्या योजनांसाठी - Horti किवा फळबाग टाइप करा. 

4. पिक विमासाठी-   पिक विमा किंवा pmfby  टाइप करा. 

5. मागेल त्याला शेततळे योजनेसाठी- mts किवा शेततळे टाइप करा. 

6. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना- gmsavy असे टाइप करा. 

7.गट शेती योजनेच्या माहिती साठी - गटशेती किंवा   gatsheti टाइप करा. 

8. शेतकरी पुरस्कार बाबत माहिती साठी - puraskar  किंवा पुरस्कार टाइप करा. 

9. फवारणी सुरक्षा किट साठी- किट किंवा kit टाइप करा. 

10. फेरोमेन ट्रॅप साठी - ट्रॅप किंवा Trap टाइप करा. 

11. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानासाठी - राफअ किंवा nhm  टाइप करा. 

12. माती नमुने बाबत माहिती साठी - soil टाइप करा. 

13. रोप वाटिका परवाना साठी- परवाना nursery licence टाइप करा. 

14. बियाणे खते कीटक नाशके विक्री परवाना बाबत माहितीसाठी - sf टाइप करा. 

15. जैविक उत्पादन माहिती साठी - bio किंवा जैविक  टाइप करा. 

16. पाईप,पंपसंच साठी - पंप किंवा pump टाइप करा.

17. शेतकरी मासिक बाबत माहितीसाठी- शेतकरी किंवा   shetkari टाइप करा. 

18-प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या माहितीसाठी- pmkmy  किंवा पेन्शन टाइप करा. 

19. शेततळे अस्तरिकरण साठी - अस्तरिकरण  किंवा   lining टाइप करा. 

20. वन शेती योजनेसाठी- वनशेती किंवा   af टाइप करा.                                             

21.रोप वाटिका च्या माहितीसाठी- रोपवाटिका किंवा nursery  टाइप करा.                                   

22. नविन विहिरिसाठी- विहिर किंवा well टाइप करा.

23.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माहिती साठी - pmkisan टाइप करा.   

24.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माहितीसाठी- pocra किंवा   पोकरा  टाइप करा.    

25. कांदा चाळ बाबत माहिती साठी- onion किंवा कांदा चाळ असे  टाइप करा.

26. प्लास्टीक मल्चींग बाबत माहिती साठी- mulching  टाइप करा.

27. फळ बागां चे पुनरुज्जीवन बाबत माहिती साठी- rej टाइप करा.

28. पक्षिरोधक व गारपीट रोधक जाळी बाबत माहितीसाठी- abnet   टाइप करा.

29. हळद रोपवाटीका बाबत माहिती साठी- turmeric टाइप करा.

30. हरीत गृहा बाबत माहिती साठी- Ngh टाइप करा.

31. शेड नेट हाऊस बाबत माहिती साठी- Nsh टाइप करा.

32.अळिंबी बाबत माहितीसाठी- mushroom टाइप करा.

33. पोकरा गावात रेशिम उद्योग बाबत माहिती साठी- pseri  तसेच रेशीम  संचालनालय  यांचे कडील योजने साठी seri किंवा रेशीम असे टाइप करा.

34. गोदाम बांधकाम अनुदान बाबत माहिती साठी- godown किंवा गोदाम असे टाइप करा.

35. बीज प्रक्रिया यूनिट अनुदान बाबत माहिती साठी - spp  असे टाइप करा.

36. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माहिती साठी-   bmkky असे टाइप करा.

37. मिनी राइस मिल बाबत माहिती साठी- मिनी राइस मिल  किंवा ricemill असे टाइप करा.

38. सूक्ष्म मुल द्रव्ये/ फॉस्फो जिप्सम(गंधक)/ जैविक खते याबाबत माहितीसाठी- inm असे टाइप करा.

39. आपणास सूक्ष्म सिंचन वितरक म्हणून शासनाकडे नोंदणी करायची असल्यास- midr टाइप करा.

40. मिनी दाल मिल बाबत माहिती साठी-   mdm असे टाइप करा.

41. कीटक नाशके/ तणनाशके याबाबत माहितीसाठी-   ipm असे टाइप करा.

42.यवतमाळ जिल्ह्यातील उपविभाग/तालुका कृषि अधिकारी कार्यालय पत्ता व फ़ोन नंबर साठी- tao किंवा तालुका  टाइप करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com