मराठवाड्यात ४२ टक्‍केच उपयुक्‍त पाणी

मराठवाड्यात ४२ टक्‍केच उपयुक्‍त पाणी
मराठवाड्यात ४२ टक्‍केच उपयुक्‍त पाणी

औरंगाबाद : पावसाळा अंतिम टप्प्यात आला तरी मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची तहान काही भागलेली नाही. ८७२ प्रकल्पांत अजूनही केवळ ४२.२२ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा असल्याची स्थिती आहे. त्यामुळे मराठवाड्यात अजूनही दमदार ते अतिजोरदार पावसाची आवश्‍यकता आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ५३.६३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. सिद्धेश्‍वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न दुधना, सीनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा अजूनही थेंब नाही. जायकवाडी तुडुंब, तर ऊर्ध्व पैनगंगा ३५ टक्‍के, निम्न मनारमध्ये ९७ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. मराठवाड्यातील ७५ पैकी २४ मध्यम प्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ३, बीडमधील ८, लातूरमधील २, तर उस्मानाबादमधील ११ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. २७ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा अजूनही जोत्याखाली आहे. 

७४९ पैकी २३३ प्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. २३७ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत ३२ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. जालना व बीड जिल्ह्यातील या प्रकल्पांची अवस्था सर्वांत बिकट आहे. जालन्यातील ५७ प्रकल्पांत केवळ ३, तर बीडमधील १२६ प्रकल्पांत केवळ २ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. लातूर जिल्ह्यातील १३२ लघू प्रकल्पांत १३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील २०५ लघू प्रकल्पांत ६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यातील ८८ प्रकल्पांत ६२ टक्के, तर हिंगोलीतील २६ लघू प्रकल्पांत ५८ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. 

परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांत केवळ २३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला असल्याचे चित्र आहे. ७५ पैकी औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत २०, तर जालन्यातील ७ मध्यम प्रकल्पांत २२ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत ते २ टक्‍केच आहे. लातूर जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पात केवळ ७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पांत ६२ टक्‍के, तर परभणी जिल्ह्यातील २ मध्यम प्रकल्पांत ३८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com