जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणी

कर्नाटकातून जत तालक्यातील ४२ गावांना पाणी देण्यासाठी लवकरच करार करण्याच घोषणा करण्यात आली, पण केवळ ही घोषणा न राहता लवकर करार पूर्ण होऊन गावांना पाणी देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. - विक्रम सावंत, जिल्हा परिषद सदस्य लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्याने हा करार करू, असे आश्वासन दिले आहे. केवळ कराराचे निवेदन देऊन काहीच उपयोग होणार नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी हालचाली कराव्यात. - सुनील पोतदार, अध्यक्ष, तालुका पाणी संघर्ष समिती, जत
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणी
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणी

सांगली : जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटकातून लवकरच पाणी देण्याचा करार करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. कर्नाटकातून पाणी मिळल्याने जत तालुक्यातील ४२ गावातील पाणीटंचाई दूर होईल. यामुळे पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. 

जत तालुक्यातील पूर्व भागातील ४२ गावे अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित आहेत. या गावांना कोणत्याही योजनेचे पाणी पोचलेले नाही. परिमाणी, या गावांत पाणीटंचाई आहे. या गावांना कर्नाटकातून पाणी देण्याचा विचार सहा सात वषार्षांपासून सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार आराखडादेखील करण्यात आला. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे हा प्रस्ताव रखडला गेला. त्यामुळे या गावांतील लोकांनी आंदोलने देखील केली. परंतु, या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. 

गेल्या वर्षभरापासून या गावांना पाणी देण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या. सांगली पाटबंधारे विभाग आणि कर्नाटक राज्यातील पाटबंधारे विभागाची सांगलीत बैठकही झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यानुसार दोन्ही राज्यांतील संबंधित विभागाने तीन महिन्यांपूर्वी चाचणी घेतली. ती यशस्वी झाली. त्यामुळे कर्नाटकातून पाणी जत तालुक्याला मिळणार असल्याने पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल. पाणी आल्याने शेती हिरवीगार होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. 

निवडणुकीमुळे आश्वासन गेल्या दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातून जतमधील ४२ गावांना पाणी देण्याचा करार लवकरच करू, अशी घोषणा केली. मात्र, अशा घोषणा दरवर्षी निवडणुकीपूर्वी केल्या जातात. वास्तविक पाहता, करार झाल्याशिवाय पाणी मिळणार नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आश्वासन दिल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com