नगर जिल्ह्यात ४३१ चारा छावण्यांची गरज

नगर जिल्ह्यात ४३१ चारा छावण्यांची गरज
नगर जिल्ह्यात ४३१ चारा छावण्यांची गरज

नगर ः दुष्काळात पशुधन वाचविण्यासाठी जिल्ह्यात जनावरांच्या सुमारे ४३१ छावण्या सुरू करण्याची आवश्‍यकता असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने केला आहे. जून महिन्यापर्यंत या छावण्या चालविण्याची गरज लक्षात घेऊन हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या छावण्यात येणाऱ्या लहान-मोठ्या जनावरांची संख्या ३७ लाख ३२ हजार ४६० एवढी गृहीत धरण्यात आली आहे. मात्र, छावण्या कधी सुरू होणार ते मात्र प्रशासनाला सांगता येईना. 

राज्य सरकारने जनावरांच्या छावण्यांबाबत धोरण जाहीर केले. मात्र, या छावण्यांसाठीच्या अटी व शर्तींबाबत संभ्रम आहे. त्यावर सध्या चर्चा सुरू आहे. मुळात डिसेंबरमध्येच (२०१८) जनावरांसाठी जिल्ह्यात ६५ छावण्या सुरू करण्याची आवश्‍यकता होती; परंतु सरकारचा निर्णय लवकर न झाल्याने पशुपालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. काही स्वयंसेवी संस्थांनी जनतेच्या मदतीने छावण्या सुरू केल्या आहेत. मात्र, त्यांचे प्रमाण फारच कमी आहे. 

येत्या पाच महिन्यांत सर्वाधिक पाथर्डी तालुक्‍यात ७४ व त्या खालोखाल जामखेड तालुक्‍यात ७२ छावण्या सुरू कराव्या लागतील. इतर तालुक्‍यातील अंदाजित छावण्यांची संख्या या प्रमाणे ः अकोले ५, नगर १७, नेवासे १०, राहुरी २०, राहाता १५, संगमनेर २०, पारनेर ५३, श्रीगोंदे ५५, कर्जत ४९, शेवगाव ३६ श्रीरामपूर २ व कोपरगाव ३. पशुसंवर्धन विभागाने जिल्हाभरातून मिळविलेल्या माहितीनुसार या छावण्यातून लहान ५ लाख २१ हजार ५१० जनावरे व मोठी ३२ लाख १० हजार ९५० जनावरे दाखल होण्याचा अंदाज वर्तविला. जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात सुरू करण्यात येणाऱ्या छावण्यांत शेजारच्या जिल्ह्यातील जनावरेही दाखल होतात.

पाच महिने चालवाव्या लागतील छावण्या  पावसाळा सुरू होईपर्यंत या छावण्या चालवाव्या लागणार आहेत. पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात फेब्रुवारीत ६०, मार्चमध्ये ६३, एप्रिलमध्ये ६०, मे महिन्यात ७० तर जूनमध्ये ४८ छावण्यांची गरज व्यक्त केली आली आहे. असे असले तरी आता तातडीन छावण्याची गरज असताना उशीर होत असल्याने पशुपालक त्रस्त आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com