agriculture news in Marathi, 43.2 temperature in akola, Maharashtra | Agrowon

अकोल्यात उच्चांकी ४३.२ अंश तापमान

टीम अॅग्रोवन
रविवार, 31 मार्च 2019

पुणे: उन्हाचा चटका वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे. तर अकोला आणि नगर येथे उष्णतेची लाट आली आहे. अकोल्यात राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ३१) विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तसेच पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे: उन्हाचा चटका वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे. तर अकोला आणि नगर येथे उष्णतेची लाट आली आहे. अकोल्यात राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ३१) विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तसेच पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

तापमान ४० अंशांपेक्षा अधिक असेल आणि सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाली असेल तर उष्णतेची लाट समजली जाते. त्यानुसार शनिवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यांत काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. पश्चिम मध्य प्रदेशातील खारगोणे येथे देशातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातील अकोला आणि नगर येथे उष्णतेच्या लाटेची स्थिती होती. 

दरम्यान, उन्हाचा ताप वाढू लागल्याने उकाडा असह्य होऊ लागला असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही त्रासदायक ठरत आहे. कोकण वगळता राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीपार आहे. तर अकोला, नगरबरोबरच जळगाव, सोलापूर, परभणी, अमरावती, चंद्रपूर, वर्धा येथे तापमान ४२ अंशांच्या वर गेले आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

शनिवारी (ता. ३०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.४ (३.०), नगर ४२.६ (४.८), धुळे ४१.८, जळगाव ४२.० (२.४), कोल्हापूर ३८.७ (२.१), महाबळेश्वर ३५.४ (३.९), नाशिक ४०.० (३.८), सांगली ३९.० (१.४), सातारा ३९.८ (४.०), सोलापूर ४२.२ (३.४), आलिबाग ३०.४ (-०.९), डहाणू ३३.७ (१.७), सांताक्रूझ ३१.६ (-०.४), रत्नागिरी ३१.५(-०.३), औरंगाबाद ४१.२ (४.१), परभणी ४२.१ (३.४), बीड ४१.५ (३.६), उस्मानाबाद ४०.५ (३.३), अकोला ४३.२ (४.५), अमरावती ४२.६ (४.०), बुलडाणा ३९.२ (३.७), बह्मपुरी ४१.२ (२.८), चंद्रपूर ४२.० (२.६), गडचिरोली ३८.६ (०.४), गोंदिया ३९.८ (०.६), नागपूर ४१.१ (३.१), वाशीम ४०.२ (०.६), वर्धा ४२.० (३.२), यवतमाळ ४१.५ (३.६). 
 


इतर अॅग्रो विशेष
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...