जळगाव जिल्ह्यातील मक्याच्या चुकाऱ्यांसाठी ४४ कोटी प्राप्त

जळगाव जिल्ह्यातील प्रतिक्षेत असलेल्या तीन हजार ८३८ शेतकऱ्यांचे ४४ कोटी ५२ लाख रुपये मिळाले आहेत. दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत.’’
 44 crore received for maize bills in Jalgaon district
44 crore received for maize bills in Jalgaon district

भडगाव, जि. जळगाव : ‘‘दोन महिन्यांपासून मक्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नव्हते. पैशांअभावी शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. आता थकीत रकमेची प्रतीक्षा संपली. जळगाव जिल्ह्यातील प्रतिक्षेत असलेल्या तीन हजार ८३८ शेतकऱ्यांचे ४४ कोटी ५२ लाख रुपये मिळाले आहेत. दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत’’, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांनी दिली.

जिल्ह्यात हमीभाव केंद्रात मक्याची विक्रमी खरेदी झाली. पण, शेतकऱ्यांना खरेदी झाल्यापासून पेमेंट मिळालेले नव्हते. त्यामुळे शेतकरी चांगलेच वैतागले होते. अखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मक्याचे थकीत पेमेंट मिळाल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यात हमीभाव केंद्राच्या माध्यमातून चार हजार १११ शेतकऱ्यांचा तब्बल दोन लाख ६९ हजार ८३५ क्विंटल मका खरेदी झाला होता. त्यानुसार सुरवातीला केवळ २७३ शेतकऱ्यांना दोन कोटी ९६ हजारांची रक्कम अदा केली होती. मात्र, तीन हजार ८३८ शेतकऱ्यांचे ४४ कोटी ५२ लाख ८३ हजार येणे होते. मंगळवारी सर्व शेतकऱ्यांची रक्कम जिल्हास्तरावर मिळाली आहे. दोन दिवसांत त्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्वारीचे पूर्ण पेमेंट अदा केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना १९ कोटींचा फायदा

जळगाव जिल्ह्यातील चार हजार १११ शेतकऱ्यांना तब्बल १९ कोटींचा फायदा झाला आहे. कारण, यंदा जिल्ह्यात मक्याचा पेरा मोठ्या प्रमाणात होता. त्यात ‘कोरोना’त अफवांच्या बाजारांमुळे पोल्ट्री उद्योग धोक्यात आला होता. त्यामुळे मक्याचे दर हजार ते अकराशेपर्यंत गडगडले होते. यंदा पहिल्यांदा ‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा मका हमीभावाने खरेदी झाला. मक्याचा एक हजार ७६० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. त्यामुळे खासगी बाजारभाव व हमीभावातील फरक पाहिला, तर जवळपास १९ कोटींचा शेतकऱ्यांचा फायदा झाला.

तालुकानिहाय मिळणारी रक्कम

तालुका थकीत शेतकरी मिळणारी रक्कम
अमळनेर  २००  १,९७,७४,४८०
भडगाव  १६५ २,०१,२५,६००
भुसावळ ११२  १,२३,६४,०००
बोदवड २९ ४५,१७,९२०
चाळीसगाव  २५१ २,७९,१८,८८०
चोपडा २७५ २७,८५,२००
धरणगाव ४४५ ५,००,७६,४००
एरंडोल २१७ २,५२,४८,९६०
जामनेर  ३६ ४०,२४,२४०
जळगाव १९९  २,३७,४०,६४०
मुक्ताईनगर  १८९ २,२४,२३,२८०
पारोळा ४५१  ५१,३९,९९
पाचोरा  ४६५ ५,६१,७७,४४०
रावेर  ३३५ ४,२३,९५,७६०
शेंदुर्णी २३४ २,९४,७८,२४०
यावल २२५ २,७८,६५,७६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com