‘वनामकृवि’तील ४४ टक्के पदे रिक्त

agriculture university
agriculture university

परभणी ः येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत पद भरतीप्रक्रिया बंद आहे. सेवानिवृत्ती तसेच पदोन्नतीमुळे पदे रिक्त होत आहेत. गेल्या वर्षभरात विविध संवर्गातील १२६ पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत एकूण १ हजार २७८ म्हणजेच ४४.३१ टक्के पदे रिक्त झाली आहेत. शिक्षण संचालक, विस्तार शिक्षण संचालक, अनेक महाविद्यालयांची प्राचार्य, प्राध्यापक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचे ग्रहण सुटत नसल्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जावर परिणाम झाला आहे. संशोधन तसेच विस्तार शिक्षण कार्यात खीळ निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत ‘अ’ ते ‘ड’ संवर्गातील सरळसेवा भरतीने भरावयाची २ हजार ३८४ पदे आणि पदोन्नतीने भरावयाची ५०१ पदे असे एकूण २ हजार ८८४ पदे मंजूर आहेत. मंजूर पदांमध्ये ‘अ’ संवर्गातील सरळसेवा भरतीची ३४५ पदे आणि पदोन्नतीची २५३ पदे असे एकूण ५९८ पदे, ‘ब’ संवर्गातील सरळसेवा भरतीची ९६ आणि पदोन्नतीची ७३ मिळून एकूण १६९ पदे, ‘क’ संवर्गातील सरळसेवा भरतीची ५५७ पदे आणि पदोन्नतीची १७२ पदे असे एकूण ७२९ पदे, ‘ड’ संवर्गातील सरळ सेवा भरतीची १ हजार ३८६ पदे मंजूर आहेत.  ३१ डिसेंबर २०१९ अखेर सर्व संवर्गाची मिळून सरळ सेवा भरती अंतर्गत १ हजार २६१ पदे आणि पदोन्नतीची ३४५ पदे असे एकूण १ हजार ६०६ पदे भरलेली आहेत. यामध्ये ‘अ’ संवर्गातील सरळ सेवा भरतीची १९१ पदे आणि पदोन्नतीची १६४ पदे असे एकूण ३५५ पदे, ‘ब’ संवर्गातील सरळसेवा भरतीची ३० आणि पदोन्नतीची ५० पदे असे एकूण ८० पदे,  प्रतिनियुक्तीची २ पदे, ‘क’ संवर्गातील सरळ सेवा भरतीची ३१९ पदे आणि पदोन्नतीची १२९  पदे असे एकूण ४४८ पदे, ‘ड’ संवर्गातील सरळ सेवा भरतीची ७२१ पदांचा समावेश आहे. ३१ डिसेंबर अखेर ‘अ’ ते ‘ड’ संवर्गातील सरळसेवा भरतीची १ हजार १२३ पदे आणि पदोन्नतीची १५५ पदे असे एकूण १ हजार २७८ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये ‘अ’ संवर्गातील सरळ सेवा भरतीची १५४ आणि पदोन्नतीची ८९ असे एकूण २४३ पदे, ‘ब’ संवर्गातील सरळसेवा भरतीची ६६ पदे आणि पदोन्नतीची २३ पदे असे एकूण ८९ पदे, ‘क’ संवर्गातील सरळसेवा भरतीची २३८ आणि पदोन्नतीची ४३ पदे असे एकूण २८१ पदे रिक्त आहेत.प्रकल्पग्रस्त तसेच पदोन्नतीने काही पदे भरण्यात आली आली. परंतु सरळ सेवा भरती बंद आहे. दर महिन्याला अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.त्यामुळे रिक्त पदांच्या संख्येत भर पडत आहे.गेला वर्षभरात शिक्षण संचालक, विस्तार शिक्षण संचालक यांच्यासह एकूण १२६ पदे रिक्त झाली. योग्य अहर्ताधारक उमेदवार मिळत नसल्यामुळे माजी सैनिकांसाठी राखीव असलेली पदे रिक्त राहत आहेत. शिक्षण शाखेतील सर्वाधिक पदे रिक्त आहेत. विद्यापीठ अंतर्गत १२ घटक महाविद्यालयांपैकी केवळ २ महाविद्यालयांना पूर्णवेळ प्राचार्य आहेत उर्वरित १० महाविद्यालयाचा पदभार विभाग प्रमुख किंवा प्राध्यापक यांच्याकडे आहे.सत्रांत परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणीसाठी कर्मचारी यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे वेळेवर निकाल लावण्यासाठी कसरत करावी लागत आहे. संशोधन शाखेतील भरलेल्या पदांची संख्या बऱ्यापैकी दिसते. परंतु संशोधक शास्त्रज्ञांना खाजगी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षणाचे तसेच अन्य कामे करावी लागतात. त्यामुळे संशोधन कार्यात अडथळे येऊन दर्जावर परिणाम होत आहे. विस्तार शिक्षण शाखेअंतर्गत दोन जिल्ह्यांसाठी एक या प्रमाणे परभणी, औरंगाबाद, अंबाजोगाई, लातूर येथे विभागीय विस्तार केंद्र आहेत. या केंद्रांसाठी व्यवस्थापकाचे पद पूर्णवेळ आहे. परंतु अन्य कर्मचारी नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अडचणी येत आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु करणे आवश्यक आहे. ‘वनामकृवि’त विविध संवर्गांतील पद संख्या स्थिती

संवर्ग  मंजूर कार्यरत  रिक्त
‘अ’ संवर्ग    ५९८  ३५५    २४३  
‘ब’ संवर्ग १६९  ८०  ८९  
‘क’ संवर्ग    ७२९  ४४८    २८१  
‘ड’ संवर्ग  १३८६  ७२१ ६६५    
प्रतिनियुक्ती    २  ०  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com