Agriculture news in marathi 44 thousand 670 tons of fertilizer available in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात ४४ हजार ६७० टन खते उपलब्ध

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

नांदेड : जिल्ह्यात सन २०२०-२१ च्या खरिप हंगामासाठी विविध ग्रेडचा २ लाख २७ हजार ९८० टन खतसाठा मंजुर करण्यात आला. गतवर्षीचा शिल्लक आणि चालू महिन्यात प्राप्त असा मिळून सध्या एकूण ४४ हजार ६७० टन खतसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

नांदेड : जिल्ह्यात सन २०२०-२१ च्या खरिप हंगामासाठी विविध ग्रेडचा २ लाख २७ हजार ९८० टन खतसाठा मंजुर करण्यात आला. गतवर्षीचा शिल्लक आणि चालू महिन्यात प्राप्त असा मिळून सध्या एकूण ४४ हजार ६७० टन खतसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

यंदाच्या खरिप हंगामासाठी जिल्ह्यात युरिया ८७ हजार टन, सुपर फॉस्फेट २८ हजार ८०० टन, पोटॅश २४ हजार टन, डिएपी ६१ हजार टन, एपीके ५७ हजार ८०० टन अशी एकूण २ लाख ५८ हजार ६०० टन खतांची मागणी करण्यात आली. परंतु, २ लाख २७ हजार ९८० टन खतसाठा मंजुर करण्यात आला. त्यात युरिया ७८ हजार २१० टन, पोटॅश २० हजार ५०० टन, सुपर फॉस्फेट ३९ हजार ३५० टन, संयुक्त खते (एनपीके) ५२ हजार ५६० टन, डिएपी ३७ हजार ३६० टन या खतांचा समावेश आहे. 

सन २०१९-२० मधील विविध ग्रेडचा मिळून ३९ हजार ५०० टन खतसाठा शिल्लक आहे. एप्रिल महिन्यात ४ हजार २१० टन युरिया,९६० टन पोटॅश मिळून एकूण ५ हजार १७० टन खतसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे सध्या एकूण ४४ हजार ६७० टन खते उपलब्ध आहेत. मंजुर खतसाठा दर महिन्याला टप्प्याटप्याने उपलब्ध होईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 
 

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...