Agriculture news in marathi, 45 crore 42 lakhs for flood victims in Parbhani district | Page 2 ||| Agrowon

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी ४५ कोटी ४२ लाखांची मदत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना अनुदान वितरित करण्यासाठी ४५ कोटी ४२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना अनुदान वितरित करण्यासाठी ४५ कोटी ४२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्राप्त निधी संबंधित तालुक्यांना वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा या सहा तालुक्यांतील एकूण १ लाख ४४ हजार ८५३ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ६६ हजार १२७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात ६५ हजार ५०७ हेक्टरवरील जिरायती पिके, ५४९ हेक्टरवरील बागायती पिके, ६९.८० हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे. 

राष्ट्रीय आपत्ती निवारण बलच्या (एनडीआरएफ) निकषानुसार जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये प्रमाणे ४४ कोटी ५४ लाख ५३ हजार रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रुपये प्रमाणे ७४ लाख १८ हजार रुपये, फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये प्रमाणे १२ लाख ५६ हजार रुपये असे एकूण ४५ कोटी  ४२ लाख रुपये निधीची मागणी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती.


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...