agriculture news in Marathi 45 factories, distilleries got permission for make sanitizer Maharashtra | Agrowon

सॅनिटायझर्ससाठी ४५ साखर कारखाने, डिस्टिलरीजना परवानगी 

राजकुमार चौगुले
रविवार, 29 मार्च 2020

अनेक कारखान्यांकडे स्पिरीटची मुबलक उपलब्धता आहे. स्पिरिट डायलूट करून सॅनिटायझर करावे लागते. ही प्रक्रिया फारशी किचकट नाही. यामुळे कारखान्यांना सहज शक्य आहे. स्पिरिटची विक्री कारखाने स्वतःच्या पातळीवर करतात. यामुळे डिस्टरीनुसार उपलब्ध साठा पाहून कारखाने मुबलक प्रमाणात सॅनिटायझरची निर्मिती कमी वेळात नक्की करू शकतील. 
- विजय औताडे, साखर तज्ञ 

कोल्हापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. विषाणूच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरला प्रचंड मागणी वाढली आहे. या मागणीमुळे आता हँड सॅनिटायझर्स बनवण्यासाठी केंद्राने देशातील विविध राज्यातील ४५ साखर कारखाने, डिस्टिलरीजना परवाने देण्यात आल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. पन्नासहुन अधिक कारखान्यांना येत्या दोन दिवसात परवाने देण्यात येतील असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

उत्पादकांना त्यांचे उत्पादन जास्तीत जास्त करण्यासाठी तीन शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितले आहे. एका महिन्यात जे उत्पादन होते ते एका दिवसात तयार केले जाईल, असे केंद्रीय सूत्रांनी स्पष्ट केले. 

सर्वसामान्यांना आणि रुग्णालयांना रास्त दराने सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात यावे यासाठी सरकारनेही किंमत मर्यादा घालून दिली होती; हँड सॅनिटायझरची जास्तीत जास्त किरकोळ किंमत २०० मिलीलीटरच्या बाटलीसाठी १०० रुपये निश्चित करण्यात आली होती. अनेक नामवंत खाजगी कंपन्यांनीही सॅनिटायझरच्या किमतीत कपात करत असल्याचे सांगितले होते. 

यानंतर केंद्राने वेगात हालचाली करून कारखान्यांना सॅनिटायझर तयार करण्यासाठी उद्युक्त केले, त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कारखान्यांनी यात सहभाग घेतल्यास आरोग्य विभागाचा बराचसा ताण कमी होण्याची शक्यता असल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

सांगलीतील या कारखान्याला परवानगी 
सांगली येथील वसंतदादा कारखान्याला स्थानिक जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. तिथे अर्धा लिटर पासून पाच लिटरपर्यंत सॅनिटायझरचे उत्पादन होणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून कारखान्याने उत्पादन सुरू करण्याचे ठरवले आहे. सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालयात ते मोफत वाटण्यात येणार आहे 

 


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...