Agriculture news in marathi, 45 lakh and 90 thousand farmers participated in crop insurance scheme in Latur, Osmanabad, Nanded, Parbhani and Hingoli. | Agrowon

पाच जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४५ लाख ९० हजार शेतकऱ्यांचा सहभाग
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

लातूर : खरीप हंगाम २०१९ मध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांतील ४५ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विविध यंत्रणेच्या माध्यमातून विमा उतरविला. त्याद्वारे पाचही जिल्ह्यांतील २३ लाख ९ हजार हेक्‍टर क्षेत्र विमासंरक्षित झाले. शेतकरी हिश्‍श्‍यापोटी १८३ कोटी ८७ लाख रुपये शेतकऱ्यांनी भरले, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. 

लातूर : खरीप हंगाम २०१९ मध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांतील ४५ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विविध यंत्रणेच्या माध्यमातून विमा उतरविला. त्याद्वारे पाचही जिल्ह्यांतील २३ लाख ९ हजार हेक्‍टर क्षेत्र विमासंरक्षित झाले. शेतकरी हिश्‍श्‍यापोटी १८३ कोटी ८७ लाख रुपये शेतकऱ्यांनी भरले, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. 

लातूर कृषी विभागाअंतर्गत पाचही जिल्ह्यांत विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ३४ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरद्वारे; तर ११ लाख ५५ हजार शेतकऱ्यांनी बॅंकांद्वारे विमा उतरविला. ५ हजार ऑनलाइन थेट विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. २३ लाख ९ हजार हेक्‍टरवरील विमासंरक्षित रक्‍कम ७२३० कोटी ७५ लाख रुपये झाली. 

लातूर जिल्ह्यात १० लाख ८२ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख ८८ हजार हेक्‍टर, उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख ६२ हजार हेक्‍टर, नांदेडमधील ११ लाख ९२ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख ७८ हजार हेक्‍टर, परभणी जिल्ह्यातील ८ लाख २० हजार शेतकऱ्यांनी ४ लाख २९ हजार हेक्‍टर; तर हिंगोलीतील ३ लाख ३९ हजार शेतकऱ्यांनी १ लाख ५० हजार हेक्‍टरवरील क्षेत्र विमासंरक्षित केले.

जिल्हानिहाय शेतकऱ्यांनी भरलेली हिस्सा रक्‍कम

लातूर ४६ कोटी १ लाख
उस्मानाबाद   ४१ कोटी ८० लाख
नांदेड  ४८ कोटी ९९ लाख 
परभणी  ३४ कोटी ३२ लाख 
हिंगोली १२ कोटी ७५ लाख 

 

इतर ताज्या घडामोडी
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...
महाशिवआघाडीत सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी...मुंबई ः राज्यात भाजपला वगळून शिवसेना, राष्ट्रवादी...
शेतकऱ्यांवर रब्बी ज्वारीचे पीक...औरंगाबाद : मकानंतर आता रब्बी ज्वारीवर लष्करी...
दौंड बाजार समितीत ज्वारीला ४३०० रुपये दरदौंड, जि. पुणे : दौंड बाजार समितीमध्ये ज्वारीची...
खानदेशात रब्बीसाठी प्रकल्पांमध्ये...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामाची शेतकरी...
पुणे : हरभरा उत्पादनवाढीसाठी ४००...पुणे ः हरभरा उत्पादनवाढीसाठी रब्बी हंगामात अकरा...
मांजरपाडा प्रकल्पग्रस्तांची पूल...नाशिक  : दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा वळण...
खारपाण पट्ट्यातील कापूस हंगामही अडचणीतअकोला ः सततच्या पावसाने खरिपातील सर्वच...
पुणे : पंचनाम्यापासून अद्यापही १५ हजार...पुणे ः पुणे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांचे...
कोल्हापूर जिल्ह्यात केवळ पाच टक्के...कोल्हापूर : पावसाचा फटका खरीप हंगामात बसल्याने...
जालना जिल्ह्यात खरेदी केंद्रांना मिळेना...जालना : जिल्ह्यातील सोयाबीन, मूग, उडीद, मक्याची...
हिंगोली : पावणेदोन कोटीचे कृषी...हिंगोली : जिल्ह्याचा २०२०-२१ या वर्षीचा संभाव्य...
सांगलीत ९९ हजार हेक्टरवर पिकांचे पंचनामेसांगली : ऑक्टोबरमधील पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे...सोलापूर : ऑक्‍टोबर महिन्यात मॉन्सुनोत्तर पावसाने...
गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रणगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३२५० ते ६२५०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...