agriculture news in Marathi, 4.5 thousand Savkar is Unauthorized in state , Maharashtra | Agrowon

राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृत

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

पुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय सापडत नसताना कमकुवत होत चाललेली सहकारी पतपुरवठा व्यवस्थेत दुसऱ्या बाजूला अनधिकृत सावकारी बोकाळली आहे. शासनाने आवाहन करूनदेखील उद्दाम बनलेल्या साडेचार हजार सावकारांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरणदेखील केलेले नाही.  

पुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय सापडत नसताना कमकुवत होत चाललेली सहकारी पतपुरवठा व्यवस्थेत दुसऱ्या बाजूला अनधिकृत सावकारी बोकाळली आहे. शासनाने आवाहन करूनदेखील उद्दाम बनलेल्या साडेचार हजार सावकारांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरणदेखील केलेले नाही.  

अनधिकृत सावकारीला वेसण घालण्याचे काम सहकार विभागाकडून सुरू आहे. तथापि, कायद्याच्या कक्षेत येऊन पारदर्शक व्यवसाय करण्याची मानसिकता सावकार लॉबीचे नाही. राज्यात १३ हजारांच्या आसपास सावकार आहेत. तसेच, शासकीय यंत्रणेला फसवून परवाना न घेता सावकारी करणारे शेकडो महाभाग विविध जिल्ह्यांमध्ये आहेत. अनधिकृत सावकारांना रोखणारी तालुका पातळीवरील यंत्रणा बळकट नाही. तसेच, असलेली यंत्रणाही कुचकामी ठरली आहे. 

कायद्याच्या कक्षेत येत सर्व कागदपत्रे जमा करून यंदा जून २०१९ अखेरपर्यंत परवाना घेण्याची मुदत सावकारांना दिली गेली होती. मात्र,  केवळ सहा हजार ५४८ सावकारांनी पुन्हा परवाना घेतला आहे. जवळपास चार हजार ५१६ सावकारांनी परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही. या सावकारांनी शेतकऱ्यांशी केलेले सर्व व्यवहार बेकायदा ठरणार आहेत. 

“सावकाराला एकदा परवाना मिळाला तरी त्याआधारे वर्षानुवर्षे सावकारी करता येत नाही. परवान्याचे नूतनीकरण न केल्यास अशी सावकारी कायद्याच्या व्याख्येनुसार अनधिकृत सावकारीत मोडते. त्यामुळे राज्यात साडेचार हजार सावकारांकडे सध्या असलेले परवाने मुदतबाह्य झालेले आहे. आता नूतनीकरणाची मुदतदेखील समाप्त झालेली आहे. त्यामुळे आता कोणत्याही सावकाराला पुन्हा परवाना घ्यावा लागेल. यासाठी सर्व प्रक्रिया नव्याने  राबवावी लागेल. अर्थात, दस्तावेज देखील अधिकृत जोडावे लागतील,” असे  सूत्रांचे म्हणणे आहे. 

राज्यात कोल्हापूर, लातूर, मुंबई  व पुणे विभागांत सर्वांत जास्त सावकार आहेत. सावकारांना मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांना व्याज लावता येत नाही. सुरक्षित कर्जासाठी १५ टक्के तर असुरक्षित कर्जावर जास्तीत जास्त १८ टक्क्यांपर्यंत व्याज लावण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. २०१४ मधील कर्जमाफीच्या कालावधीत विदर्भ, मराठवाड्यात ६० कोटीपेक्षा जास्त रक्कम सावकारांना मिळाली आहे. यंदाच्या कर्जमाफीच्या कक्षेत सावकारी कर्जेदेखील आलेली आहेत. 

“सावकारी कर्जमाफीमध्ये माफीची रक्कम शेतकऱ्याला न मिळता सावकाराला दिली जाते. मात्र, शेतकऱ्याने आधीच जर कर्ज चुकते केले असल्यास अशा रकमा सावकाराच्या देय रकमांमधून वगळल्या जातील,” असे सहकार विभागाचे म्हणणे आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...