‘चांदोली‘तील ४.५० टीएमसी पाणी कृष्णेत

या वर्षी कृष्णेची मागणी लवकर आल्याने व परतीचा पाऊस न आल्याने पाणीसाठ्यात गतवर्षाच्या तुलनेत घट झाली. तरी पुरेसा साठा असून, उपलब्ध पाण्याचे योग्य प्रकारे नियोोजन केले असल्याने पाण्याची पिण्यासाठी व सिंचनासाठी चिंता करण्याची गरज नाही. - प्रदीप कदम, शाखा अधिकारी वारणा पाटबंधारे विभाग, वारणावती
‘चांदोली‘तील ४.५० टीएमसी पाणी कृष्णेत
‘चांदोली‘तील ४.५० टीएमसी पाणी कृष्णेत

शिराळा, जि. सांगली : चांदोली धरण परिसरात गतवर्षाच्या तुलनेत सध्या ५.३८ टीएमसी कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तरीही रब्बी हंगामाच्या सुरवातीपासूनच सातत्याने कृष्णा नदीवरील म्हैसाळ योजनेसाठी वारणा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या ४.५० टीएमसी एवढे पाणी सोडण्यात आले आहे.

म्हैसाळला गत वर्षाच्या तुलनेत आत्तापर्यंत ४ टीएमसी ज्यादा पाणी देण्यात आले आहे. परतीचा पाऊस न झाल्याने म्हैसाळ योजनेला पाण्याची मागणी नेहमीपेक्षा लवकर करण्यात आली. गत वर्षाच्या तुलनेत ज्यादा पाऊस पडूनही साडेपाच टीएमसी पाणीसाठ्याची घट दिसून येत आहे. सध्या वाकुर्डे योजना सुरू झालेली नाही. त्यासाठी असणारा ५.२६ टीएमसी पाणीसाठा हा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने जास्त वापरला जात नाही. सध्या शिल्लक पाणीसाठा कृष्णा नदीवरील वापरासाठी सोडला जात आहे. रब्बी हंगाम संपत आला असून, उर्वरित शिल्लक पाणीसाठा उन्हाळी हंगामाकरिता वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

या वर्षी परतीच्या पावसाने दोन महिने ओढ दिल्याने व कृष्णेची लवकर पाणी मागणी आल्याने वारणा धरणाच्या पाणीसाठ्यात गतवर्षाच्या तुलनेत साडेपाच टीएमसी घट झाली असून, या वर्षी धरण १०० टक्के भरलेच नाही. शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या पश्चिम भागातील वारणा धरण हे हमखास भरते. धरणात अतिरिक्त साठा होऊ नये व धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणातून पाणी सोडले जाते. सप्टेंबर, ऑक्टोबरला येणाऱ्या परतीच्या पावसामुळे दोन ते चार टीएमसी वाढ होते. हा धरण प्रशासनाचा अनुभव आहे. दहा ऑक्टोबरपासून वारणा धरणातून पाणी सोडण्यास सुरवात झाली. त्यानुसार कृष्णेला ४.५० टीएमसी पाणी देण्यात आले. गतवर्षी २३४५ मि.मी पाऊस पडला होता. या वर्षी २९४० मीमी म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा ९५ मि.मी जास्त पडला. 

वारणेच्या पाण्याचे मंजूर पाणीवापर नियोजन (टीएमसीमध्ये) 

  •  वारणा सिंचन    ८.७
  •  म्हैसाळ/ कृष्णा नदी    ३.६४
  •  वाकुर्डे     ५.२६ 
  •  एकूण सिंचन    १७.८७.   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com