Agriculture news in marathi 45,000 applications for crop insurance in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे ४५ हजार अर्ज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या ४५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे दावे दाखल केले आहेत.

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या ४५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे दावे दाखल केले आहेत. प्राप्त अर्जानुसार शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ॲपच्या माध्यमातून पंचनामे सुरु असल्याची माहिती विमा कंपनीच्या सूत्राने दिली. पावसाचा तडाखा सुरुच असल्याने नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टी व पूर जिल्ह्यात १५ ते १९ सप्टेंबर दरम्‍यान तसेच २६ आणि २७ सप्टेंबरला काही मंडळात अतिवृष्‍टी झाली आहे. काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शासन निर्णय २९ जून २०२० नुसार ज्‍या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, अशा शेतकऱ्यांनी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे झालेल्‍या पिकाच्या नुकसानीचा दावा विमा कंपनीकडे ७२ तासाच्‍या आत नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी केले होते. यानुसार मंगळवार (ता.२९) पर्यंत जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अर्ज केल्याची माहिती सूत्राने दिली. 

ज्या शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी करून पंचनामे करण्याची तीनशेच्यावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी विमा कंपनीच्या ॲपवर पिकांची नोंदणी करतात. यानंतर नुकसानीची माहिती कंपनीकडे पाठविली जाते. दरम्यान, मुखेड, देगलूर, बिलोली आदी तालुक्यात नदीकाठच्या भागात तसेच सखल भागात पाणी साचल्यामुळे पंचनामे करण्यास अडचणी येत असल्याची माहिती विमा कंपनीकडून मिळाली.

असे नोंदवा दावे

अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान होत असेल तर पुढीलप्रमाणे विमा कंपनी आपले दावे नोंदवावेत. यासाठी शेतकऱ्यांना १८००१०३५४९० या टोल फ्री नंबरवर कॉल करता येईल अथवा कंपनीच्‍या ई-मेल आयडी suportagri@iffcotokio.co.in वर अर्ज पाठवता येईल. क्रॉप इन्शुरन्स अॅपद्वारे ही अर्ज नोंदवता येईल. तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज देऊन दावा नोंदवता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिली आहे.


इतर ताज्या घडामोडी
किसान रेल्वेने सांगलीतून हळद जाणार इतर...सांगली ः किसान रेल्वेतून शेतकऱ्यांसह, उद्योग आणि...
वऱ्हाडात पीएम किसानचे साडे तेरा कोटी...अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस...
चिपळूणात साडेसात हजार शेतकऱ्यांना...रत्नागिरी ः परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्यातील...
रिसोड बाजारात सोयाबीनची विक्रमी आवकवाशीम ः रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी ३३५ कोटींची...सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील...
अकोल्यात शेतकरी करणार दोन लाख क्विंटल...अकोला ः गेल्या काही हंगामापासून सोयाबीन...
संत गाडगेबाबा सूतगिरणी सुरू करावी ः...अमरावती : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील सगळी धरणे तुडूंबपुणे ः चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये...
भंडाऱ्यात ७९ धान खरेदी केंद्रांना मंजुरीभंडारा ः केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी...
सोलापूर जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी...जळगाव ः खानदेशात यंदा गव्हाची पेरणी सुमारे दोन...
परभणी जिल्ह्यात सतरा हजार क्विंटल...परभणी : ‘‘यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी...
शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षातऱ्हाडी, जि. धुळे : वरुणराजाच्या लहरीपणामुळे पिके...
नाशिक जिल्ह्यात लिलाव बंदमुळे शेतकरी...नाशिक : मागील वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस व...
‘कृषी स्वावलंबन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज...परभणी : ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ....
सोयाबीन बियाणे विक्रेत्यांविरुध्द ...अकोला ः यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवले...
शोषणाविरोधात एकवटले संत्रा उत्पादक अमरावती : व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार...
कांदा साठा मर्यादा वाढविण्याची मागणी नाशिक: कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते...द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा...