Agriculture news in marathi 45,000 applications for crop insurance in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे ४५ हजार अर्ज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या ४५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे दावे दाखल केले आहेत.

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या ४५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे दावे दाखल केले आहेत. प्राप्त अर्जानुसार शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ॲपच्या माध्यमातून पंचनामे सुरु असल्याची माहिती विमा कंपनीच्या सूत्राने दिली. पावसाचा तडाखा सुरुच असल्याने नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टी व पूर जिल्ह्यात १५ ते १९ सप्टेंबर दरम्‍यान तसेच २६ आणि २७ सप्टेंबरला काही मंडळात अतिवृष्‍टी झाली आहे. काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शासन निर्णय २९ जून २०२० नुसार ज्‍या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, अशा शेतकऱ्यांनी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे झालेल्‍या पिकाच्या नुकसानीचा दावा विमा कंपनीकडे ७२ तासाच्‍या आत नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी केले होते. यानुसार मंगळवार (ता.२९) पर्यंत जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अर्ज केल्याची माहिती सूत्राने दिली. 

ज्या शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी करून पंचनामे करण्याची तीनशेच्यावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी विमा कंपनीच्या ॲपवर पिकांची नोंदणी करतात. यानंतर नुकसानीची माहिती कंपनीकडे पाठविली जाते. दरम्यान, मुखेड, देगलूर, बिलोली आदी तालुक्यात नदीकाठच्या भागात तसेच सखल भागात पाणी साचल्यामुळे पंचनामे करण्यास अडचणी येत असल्याची माहिती विमा कंपनीकडून मिळाली.

असे नोंदवा दावे

अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान होत असेल तर पुढीलप्रमाणे विमा कंपनी आपले दावे नोंदवावेत. यासाठी शेतकऱ्यांना १८००१०३५४९० या टोल फ्री नंबरवर कॉल करता येईल अथवा कंपनीच्‍या ई-मेल आयडी suportagri@iffcotokio.co.in वर अर्ज पाठवता येईल. क्रॉप इन्शुरन्स अॅपद्वारे ही अर्ज नोंदवता येईल. तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज देऊन दावा नोंदवता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिली आहे.


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...