agriculture news in marathi 47 lakh tonnes of sugarcane crushed in five districts | Agrowon

औरंगाबाद विभागात उसाचे ४७ लाख टन गाळप

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

औरंगाबाद : येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत पाच जिल्ह्यांतील २१ कारखान्यांनी २० जानेवारीपर्यंत ४७ लाख ३ हजार ३७० टन उसाचे गाळ केले.

औरंगाबाद : येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत पाच जिल्ह्यांतील २१ कारखान्यांनी २० जानेवारीपर्यंत ४७ लाख ३ हजार ३७० टन उसाचे गाळ केले. या गाळपातून सर्वसाधारण ८.६१ टक्‍क्‍यांच्या उताऱ्याने ४० लाख ५० हजार ६९५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. 

औरंगाबाद प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयांतर्गत ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या आता २१ वर पोचली आहे. औरंगाबाद, जालना, बीड, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यातील या कारखान्यांची ऊस गाळपाची व साखर उताऱ्यांचे प्रमाण आता वाढत आहे.  नंदूरबार जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी ३ लाख २६ हजार २२६ टन उसाचे गाळप केले.  ८.३४ टक्‍के साखर उताऱ्याने २ लाख ७१ हजार ९८० क्‍विंटल साखर उत्पादन घेतले. 

जळगावातील एका कारखान्याने २ लाख ११ हजार १५० टन उसाचे गाळप करून सरासरी ९.०३ टक्‍के साखर उतारा घेतला. तर १ लाख ९० हजार ७५० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील ६ कारखाने गाळपात सहभागी झाले आहेत. या सर्व कारखान्यांनी सरासरी ८.६४ टक्‍के साखर उतारा राखत ११ लाख ७२ हजार टन उसाचे गाळप केले. तर १० लाख १२ हजार ५८० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. 

जालना जिल्ह्यातील ५  कारखान्यांनी ११ लाख ९० हजार ६६९ टन उसाचे गाळप करून ८.९६ टक्‍के साखर उतारा घेतला. १० लाख ६७ हजार ३१५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील ७ कारखाने प्रत्यक्ष गाळप करीत आहेत. या कारखान्यांनी १८ लाख ३ हजार ३२३ टन उसाचे गाळप करून ८.३६ टक्‍के साखर उताऱ्याने १५ लाख ८ हजार ७० क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले. 

वैद्यनाथ डिसेंबरमध्ये सुरू

गाळपाच्या हंगामात उतरलेले जवळपास सर्व कारखाने ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर  दरम्यान सुरू झाले आहेत. तर बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ हा एकमेव कारखाना डिसेंबरच्या मध्यात गाळपाच्या हंगामात उतरला असल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून देण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
शासकीय हरभरा खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
बंद आठवडी बाजाराचा कांदा उत्पादकांना...जळगाव ः जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत...
महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘...रत्नागिरी ः पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार...
कापडण्यात कांद्याला फटकाकापडणे, जि. धुळे : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस...
परभणी जिल्ह्यात अवकाळीने हरभरा, ज्वारी...परभणी ः जिल्ह्यात या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस...
मारुती माळ येथे टस्कराचे दर्शनकोल्हापूर ः बाळेघोल (ता. कागल) येथील जंगलातून...
मराठवाड्यात अवकाळीने ३३ टक्के पिकांचे...औरंगाबाद : अठरा व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्तांसाठी...नांदेड : जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या...
निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण...अमरावती : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला...
...तर खंडणीचे गुन्हे दाखल करा ः गरडपुणे ः ‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली...
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा...कोल्हापूर ः राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून...
बाजार समित्यांनी पेट्रोल, सीएनजी पंप...परभणी ः उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा...
जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची ‘गिनेस...जळगाव :  जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष...
सातारा जिल्ह्यात ५५ टक्के क्षेत्रावर...सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४...
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी योजनामहाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि नाबार्डद्वारे...
कृषी सल्ला (परभणी विभाग)पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी भाजीपाला...
राज्यात टोमॅटो १५० ते १००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला ३०० ते ६०० रुपये दर...
वनशेतीमध्ये चारा पिकांची लागवड फायदेशीर...वनशेतीमध्ये वनीय कुरण, कृषी वनीयकुरण, उद्यान...
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...