भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
बातम्या
औरंगाबाद विभागात उसाचे ४७ लाख टन गाळप
औरंगाबाद : येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत पाच जिल्ह्यांतील २१ कारखान्यांनी २० जानेवारीपर्यंत ४७ लाख ३ हजार ३७० टन उसाचे गाळ केले.
औरंगाबाद : येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत पाच जिल्ह्यांतील २१ कारखान्यांनी २० जानेवारीपर्यंत ४७ लाख ३ हजार ३७० टन उसाचे गाळ केले. या गाळपातून सर्वसाधारण ८.६१ टक्क्यांच्या उताऱ्याने ४० लाख ५० हजार ६९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
औरंगाबाद प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयांतर्गत ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या आता २१ वर पोचली आहे. औरंगाबाद, जालना, बीड, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यातील या कारखान्यांची ऊस गाळपाची व साखर उताऱ्यांचे प्रमाण आता वाढत आहे. नंदूरबार जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी ३ लाख २६ हजार २२६ टन उसाचे गाळप केले. ८.३४ टक्के साखर उताऱ्याने २ लाख ७१ हजार ९८० क्विंटल साखर उत्पादन घेतले.
जळगावातील एका कारखान्याने २ लाख ११ हजार १५० टन उसाचे गाळप करून सरासरी ९.०३ टक्के साखर उतारा घेतला. तर १ लाख ९० हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील ६ कारखाने गाळपात सहभागी झाले आहेत. या सर्व कारखान्यांनी सरासरी ८.६४ टक्के साखर उतारा राखत ११ लाख ७२ हजार टन उसाचे गाळप केले. तर १० लाख १२ हजार ५८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
जालना जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी ११ लाख ९० हजार ६६९ टन उसाचे गाळप करून ८.९६ टक्के साखर उतारा घेतला. १० लाख ६७ हजार ३१५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील ७ कारखाने प्रत्यक्ष गाळप करीत आहेत. या कारखान्यांनी १८ लाख ३ हजार ३२३ टन उसाचे गाळप करून ८.३६ टक्के साखर उताऱ्याने १५ लाख ८ हजार ७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.
वैद्यनाथ डिसेंबरमध्ये सुरू
गाळपाच्या हंगामात उतरलेले जवळपास सर्व कारखाने ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान सुरू झाले आहेत. तर बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ हा एकमेव कारखाना डिसेंबरच्या मध्यात गाळपाच्या हंगामात उतरला असल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून देण्यात आली.
- 1 of 1540
- ››