agriculture news in marathi, 478 rooms in schools are dangerous | Agrowon

शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

पुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील २४२ शाळांमधील ४९८ वर्गखोल्या धोकादायक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या खोल्यांमध्ये शाळा भरवू नयेत, असा सूचना संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या. या शाळांतील विद्यार्थ्यांना तात्पुरते अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी दिली.

पुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील २४२ शाळांमधील ४९८ वर्गखोल्या धोकादायक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या खोल्यांमध्ये शाळा भरवू नयेत, असा सूचना संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या. या शाळांतील विद्यार्थ्यांना तात्पुरते अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी दिली.

नारायणपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडलेल्या घटनेमध्ये चार मुले गंभीर जखमी झाली. या घटनेचे  पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. अध्यक्ष विश्‍वास देवकाते आणि उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व धोकादायक शाळांची माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिले.

दरम्यान, जिल्ह्यात ३ हजार ६७२ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यामध्ये २४२ शाळांमधील ४९८ वर्गखोल्या धोकादायक असून, त्या वापरण्यास अयोग्य असल्याचे शिक्षण विभागाने दिलेल्या अहवालातून स्पष्ट होते.

जुन्नर, दौंड, हवेली, मावळ आणि आंबेगाव या तालुक्‍यातील धोकादायक वर्गखोल्यांची संख्या अधिक आहे. या खोल्या पाडून नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सर्व शिक्षा अभियानांतर्गत निधी मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषदेचा निधीच्या माध्यमातून या शाळा बांधण्यात येणार असून, त्याबाबत प्रस्ताव करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

धोकादायक शाळांची संख्या, कंसात धोकादायक

वर्गखोल्यांची संख्या : आंबेगाव २३ (४६), बारामती ८ (१६), भोर १६ (२९), दौंड २३ (५७), हवेली १८ (५७ वर्ग), इंदापूर १९ (३०), जुन्नर २७ (६४), खेड २५ (५२), मावळ २१ (५०), मुळशी १३ (२१), पुरंदर १२ (२६), शिरूर ७ (२०), वेल्हे ३० (३०).


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...