अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
बातम्या
‘सोलापूर, पुण्यात वन्यप्राणी हल्ला बाधितांना ४८ लाखांची भरपाई’
सोलापूर ः पुणे आणि सोलापूर वनविभागांतर्गत गेल्या तीन वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या विविध प्रकारच्या नुकसानीची ५४७ प्रकरणे मंजूर झाली आहेत.
सोलापूर ः ‘‘पुणे आणि सोलापूर वनविभागांतर्गत गेल्या तीन वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या विविध प्रकारच्या नुकसानीची ५४७ प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यापोटी तब्बल ४८ लाखांची नुकसान भरपाई वनमंत्री संजय राठोड यांनी दिली’’, अशी माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
मागच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात देशमुख यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला वनमंत्री राठोड यांनी पत्राद्वारे उत्तर दिले आहे. पुणे वनविभागातंर्गत पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यात बिबट्या, तरस, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा या वन्यप्राण्यांचा अधिवास असल्याचे निर्दशनास आले आहे. या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात या दोन्ही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत आ. देशमुख यांनी अधिवेशनात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना वनविभागाने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेले पीक नुकसानीचे तीन वर्षात १५१ प्रकरणे मंजूर केली. १३ लाख ५८ हजार, पशू हानीचे ३८१ प्रकरणे मंजूर करून सुमारे ३२ लाख ६७ हजार, तर मनुष्य हानीची १६ प्रकरणे मंजूर करून १ लाख ६७ हजारांची भरपाई दिली. एकूण ५४७ प्रकरणे मंजूर केली. तर सुमारे ४८ लाखांची नुकसान भरपाई दिल्याचे या उत्तरात म्हटले आहे, असेही देशमख म्हणाले.
उस्मानाबादलाही लवकरच मदत
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान केलेली १०० प्रकरणे मंजूर केली आहेत. निधी अभावी १ लाख ६८ हजारांची नुकसान भरपाई प्रलंबित असल्याचे कळवले आहे. तर उर्वरित नुकसान भरपाई लवकरच देण्याची प्रकिया सुरू असल्याचे वनविभागाने कळवले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
- 1 of 1537
- ››