मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील ४८ बाजार समित्या हळूहळू पूर्वपदावर

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या पाच जिल्ह्यातील ४८ बाजार समित्यांमधील हळूहळू आवक सुरू होत आहे. तेथील स्थिती पूर्वपदावर येत आहे. नियमित असलेल्या खरेदीला कुठे थोडा वेग, तर कुठे अनियमित आवक असलेल्या बाजार समित्यांचे काम पूर्वपदावर येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
48 market committees in five districts of Marathwada gradually resumed
48 market committees in five districts of Marathwada gradually resumed

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या पाच जिल्ह्यातील ४८ बाजार समित्यांमधील हळूहळू आवक सुरू होत आहे. तेथील स्थिती पूर्वपदावर येत आहे. नियमित असलेल्या खरेदीला कुठे थोडा वेग, तर कुठे अनियमित आवक असलेल्या बाजार समित्यांचे काम पूर्वपदावर येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात १०, जालना जिल्ह्यात ८, बीड जिल्ह्यात १०, लातूर जिल्ह्यात ११, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ९ मिळून ४८ बाजार समित्या आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला केलेल्या लॉकडाऊनमध्ये या सर्वच बाजार समित्यांमध्ये धान्याच्या आवकेवर परिणाम झाला होता. भाजीपाला नियमित असलेल्या बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक होत असली, तरी धान्य, कडधान्यांची आवक तुलनेने कमी होती. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन १४ एप्रिलला वाढविण्यात आले. त्यानंतर आता बाजार समित्यांमधील आवक हळूहळू पूर्वपदावर येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, अशी माहिती सहकार व पणनच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील एक-दोन अपवाद वगळता जवळपास आठ बाजार समित्यांचे दैनंदिन कामकाज लॉकडाऊनच्या काळात सुरु होते व आहे. नियमित भाजीपाला असणाऱ्या समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक होत होती. औरंगाबाद बाजार समितीमध्ये बऱ्यापैकी होत आहे. त्यामुळे कुठेही अडचण नसल्याचे ‘सहकार’च्या सूत्रांनी सांगितले. 

जालना जिल्ह्यातील ८ बाजार व २२ उपबाजारांपैकी आष्टी बाजार समितीत आवक होत नाही. उर्वरित ७ बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची, तर धान्याची कमी-अधिक प्रमाणात सर्वच बाजार समित्यांमध्ये आवक सुरू होती. बीड जिल्ह्यात बीड, गेवराई, माजलगाव, कडा या बाजार समित्यांमध्ये अन्न- धान्याची आवक सुरू होती. तर, वडवणी, धारूर, परळी, अंबाजोगाई, पाटोदा आदी बाजार समित्यांमध्ये आवक निरंक होती. जिल्ह्यातील एकाही बाजार समितीमध्ये फळे भाजीपाला नियमित केलेला नाही. दुसरीकडे दैनंदिन कामकाज सुरू असले, तरी शेतमालाची आवक मात्र अत्यंत कमी होत होती.  टोकण पद्धतीने धान्यांची खरेदी 

लातूर जिल्ह्यात ११, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ बाजार समित्यांमध्ये भाजीपाला नियमित येत होता. तर, अलीकडच्या दोन दिवसांत जळकोट, लातूर, उस्मानाबाद व उदगीर या बाजार समित्यांमध्ये सर्व नियमांचे पालन करून टोकण पद्धतीने धान्य व कडधान्यांची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. सोमवारपर्यंत उर्वरित सर्वच बाजार समित्यांमधील खरेदी- विक्रीची प्रक्रिया पूर्वपदावर येण्याची अपेक्षा ‘पणन’च्या सूत्रांनी व्यक्त केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com