मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके करपण्याच्या स्थितीत : कृषी विभाग

मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी : कृषी विभागाची माहिती
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी : कृषी विभागाची माहिती

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६ हजार १८३ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत गुरुवार अखेरपर्यंत (ता. ११) २४ लाख ३१ हजार हेक्‍टरवर पेरणी उरकली. त्याची एकूण टक्केवारी ४८.६६ झाली. पावसाची असमान हजेरी, दिलेली ओढ आदी कारणांमुळे पेरलेली पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊसच झाला नसल्याने पेरणी रखडल्याचे चित्र आहे.  

मराठवाड्यात यंदाच्या खरिपासाठी ४९ लाख ९६ हजार हेक्‍टर क्षेत्र नियोजित करण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक १७ लाख ७६ हजार ६५६ हेक्‍टरवर कापूस; तर त्याखालोखाल १२ लाख ३४ हजार ५०७ हेक्‍टरवर सोयाबीन, ८ लाख ५३ हजार ५९ हेक्‍टरवर तृणधान्य, ८ लाख ५९ हजार ८८४ हेक्‍टरवर कडधान्य, ७७ हजार ५०० हेक्‍टरवर इतर गळीत धान्याचा समावेश होता. 

सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत औरंगाबाद कृषी विभागांतर्गत तीन जिल्ह्यांत ६७.०६ टक्‍के क्षेत्रावर, तर लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत ३५.४९ टक्‍के क्षेत्रावरच खरिपाची पेरणी झाली. भाताच्या १९ हजार ३८४ हेक्‍टर नियोजित क्षेत्रापैकी ५३६ हेक्‍टरवर लागवड झाली. ३ लाख ५५ हजार हेक्‍टरपैकी २६ हजार १० हेक्‍टरवर ज्वारीची, २ लाख १९ हजार हेक्‍टरपैकी ६० हजार ९८ हेक्‍टरवर बाजरीची पेरणी झाली. 

मक्याचे २ लाख ४९ हजार हेक्‍टर क्षेत्र नियोजित होते. प्रत्यक्षात १ लाख ८४ हजार ४४९ हेक्‍टरवरच पेरणी झाली. ५ लाख ३९ हजार ३४२ हेक्‍टरपैकी १ लाख ८० हजार ३४० हेक्‍टरवर तुरीची, १ लाख ५७ हजार ८४३ हेक्‍टरपैकी ६६ हजार ४२३ हेक्‍टरवर मुगाची; तर १ लाख ५० हजार ७४५ हेक्‍टरपैकी ४९ हजार ६४६ हेक्‍टरवर उडदाची पेरणी झाली.  ११ हजार ९५४ हेक्‍टरपैकी १३२९ हेक्‍टरवर इतर कडधान्यांची पेरणी झाली. तिळाचे क्षेत्र सातत्याने घटतच असून यंदा नियोजित १६ हजार २५६ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत केवळ १७११ हेक्‍टरवरच तिळाची पेरणी झाली. २६ हजार ६४२ हेक्टरपैकी केवळ ६३६० हेक्‍टरवर भुईमुगाची लागवड झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 

मराठवाड्यातील पावसाची स्थिती पाहता, आठवडाभरात कृत्रिम पावसाविषयीचा निर्णय घेण्याची मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री व कृषिमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

जिल्हानिहाय नियोजित, प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्‍टर)

जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र  प्रत्यक्ष पेरणी  टक्‍के
औरंगाबाद ७३२८४६ ४६०६२१  ६२.८५
जालना ५८७२५७ ४०५२४७ ६९.०१
बीड ७६३७८२ ५३१५२०  ६९.५९
लातूर ६२४८६५ १४१५४५ २२.६५
उस्मानाबाद ४१२९७० १४३२२० ३४.६८
परभणी  ६२४२४८ २१२३२४ ३४.०१
हिंगोली  ४०१२८८ १९७२२६ ४९.१५
नांदेड ८४८९२७ ३३९३३३  ३९.९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com