रोग, किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी यंत्रांचा वापर केला जातो.
ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत ४८ टक्केच उपयुक्त पाणी
औरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत केवळ ४८.२५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ४ मध्यम व ४४ लघू प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. ११९ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखालीच असून, पाच मोठे प्रकल्प तुडुंब तर दोनमध्ये अजूनही उपयुक्त पाणीसाठाच झाला नसल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.
औरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत केवळ ४८.२५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ४ मध्यम व ४४ लघू प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. ११९ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखालीच असून, पाच मोठे प्रकल्प तुडुंब तर दोनमध्ये अजूनही उपयुक्त पाणीसाठाच झाला नसल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.
सप्टेंबरअखेरपर्यंत मराठवाड्यातील पाणीसाठ्याची स्थिती पाहता पुन्हा एकदा मराठवाड्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागते की काय अशी स्थिती होती. परंतु ऑक्टोबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, हा पाऊस मराठवाड्यातील प्रकल्पांसाठी संजीवनी देणारा ठरला आहे.
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी मांजरा व सिनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा नाही. तर जायकवाडी, येलदरी, माजलगाव, निम्न मनार, विष्णूपुरी हे पाच मोठे प्रकल्प तुडुंब आहेत. सिद्धेश्वर प्रकल्पात ९८ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात ७९ टक्के, निम्न तेरणा प्रकल्पात ३५ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांमध्ये ४८.२५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पात केवळ २८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यापाठोपाठ सर्वाधिक २०५ लघू प्रकल्प असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ३६ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत ४९ टक्के, बीड जिल्ह्यातील १२६ लघू प्रकल्पांत ४५ टक्के, लातूर जिल्ह्यातील १३२ लघू प्रकल्पांत ५२ टक्के, नांदेड जिल्ह्यातील ८८ प्रकल्पांत ८३ टक्के, परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांत ५३ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील २६ लघू प्रकल्पांत ८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी १६ मध्यम प्रकल्पांत ४६ टक्के, जालनामधील ७ प्रकल्पांत ३६ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पांत ५३ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत २९ टक्के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत ४६ टक्के, परभणीमधील २ प्रकल्पात ९२ टक्के पाणीसाठा झाला असून नांदेड जिल्ह्यातील सर्व ९ मध्यम प्रकल्प तुडुंब झाले आहेत.
मध्यम प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील १, बीडमधील ४, लघू प्रकल्पांपैकी औरंगाबाद, बीडमधील प्रत्येकी १६, उस्मानाबादमधील ५, लातूरमधील ६ तर जालनामधील एक प्रकल्प अजूनही कोरडाठाकच असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
- 1 of 1027
- ››