इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात 

गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात झालेल्या साखरेपैकी ४८ टक्के साखर इंडोनेशिया आणि अफगाणिस्तानला गेली आहे. आतापर्यंत २९ लाख टन साखर प्रत्यक्षात निर्यात झाली. यापैकी इंडोनेशियाने ११.५, तर अफगाणिस्ताने ४.७ लाख टन साखर खरेदी केली.
48% sugar exports to Indonesia, Afghanistan
48% sugar exports to Indonesia, Afghanistan

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात झालेल्या साखरेपैकी ४८ टक्के साखर इंडोनेशिया आणि अफगाणिस्तानला गेली आहे. आतापर्यंत २९ लाख टन साखर प्रत्यक्षात निर्यात झाली. यापैकी इंडोनेशियाने ११.५, तर अफगाणिस्ताने ४.७ लाख टन साखर खरेदी केली. 

यंदा अनंत अडचणींनंतरही निर्यातीचा वेग चांगला आहे. एप्रिल मध्यापर्यंत ४६ लाख टनांपेक्षा अधिक साखरेचे करार झाले. यापैकी २९ लाख टन साखर संबधित देशांना पोहोच झाली. इंडोनेशियाला यापूर्वी थायलंडकडून साखरेचा पुरवठा होत होता. पण गेल्या वर्षीपासून थायलंडच्या उसाच्या क्षेत्रात पर्यायाने साखर उत्पादनात पन्नास टक्क्यांपर्यंत घट झाली. याचा परिणाम थायलंडच्या निर्यातीवर झाला. इंडोनेशियाची साखरेची गरज कायम राहिल्याने भारताला त्यांच्या बाजारपेठेत प्रवेश करणे सहज शक्य झाले. इंडोनेशियाने दीड वर्षापूर्वीच आयात शुल्कात कपात करीत भारताला साखरनिर्यातीसाठी दारे उघडी करून दिली. याचा फायदा भारताला गेल्या वर्षीपासून होत असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. 

गेल्या वर्षीच्या निर्यातीची तुलना करता यंदा प्रत्यक्षात झालेली साखर निर्यात काहीशी कमी आहे. गेल्या वर्षी मार्चअखेरपर्यंत ३०.६४ लाख टन साखरेची निर्यात झाली होती. यंदा ती २९ लाखांपर्यंत आहे. गेल्या हंगामात निर्यात धोरण लवकर जाहीर झाले होते. या तुलनेत यंदा उशीरा हे धोरण जाहीर झाले. तरीही निर्यातीची गती मात्र धोरण जाहीर झाल्यापासूनच तातडीने वाढली. विशेष म्हणजे पहिल्या तीन महिन्यांतच कारखान्यांनी २५ लाख टनांहून अधिक साखर निर्यात केली. यामध्ये मार्चमध्ये सर्वाधिक १२ लाख टन साखर निर्यात झाली. 

आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या म्हणजे ६० लाख टनांच्या ४२ टक्के साखर परदेशी निर्यात झाली. प्रत्यक्षात गेलेल्या साखरे व्यतिरिक्त सुमारे ९ लाख टन साखर निर्यातीच्या वाटेवर आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही निर्यात पूर्ण होईल, असा अंदाज आहे. ही साखर बाहेर पडल्यास एप्रिल अखेर ३८ लाख टन साखर निर्यात झालेली असेल, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.   

मार्च अखेरची निर्यातीची स्थिती (लाख टन) 
झालेले निर्यात करार ४६ 
प्रत्यक्षात निर्यात २९ 
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला निर्यात १६.२
निर्यातीसाठी कारखान्यांतून बाहेर पडलेली साखर ८ 
(स्रोत- इस्मा) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com