गाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन चारा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा आपल्या जिल्ह्यात उत्पादन करावा, यासाठी सरकारने गाळपेर क्षेत्रावर लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी व संबंधित संस्थेने गाळपेर क्षेत्रात लागवड करण्यासाठी ग्रामसेवक, कृषी सहायक, पशुवैद्यकीय सहायक अधिकारी यांच्याकडे फॉर्म भरून द्यावा. - डॉ. व्ही. डी. गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
गाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन चारा
गाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन चारा

  नाशिक : दुष्काळात जिल्ह्यात चाराटंचाई भासू नये म्हणून धरणातील गाळपेर क्षेत्रातून सुमारे ४८ हजार टन चारा उत्पादित होणार आहे. सुमारे १२०० हेक्टर गाळपेर क्षेत्रातून हे उत्पादन होईल. त्यासाठी जिल्ह्यातील संबंधित शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

राज्य शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धरण, जलाशय व तलावाखालील गाळपेर क्षेत्रावर चारा पिकांचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला.

मेंढ्या, शेळ्या सोडून जिल्ह्यात १५ तालुक्यांमध्ये १२ लाख ३७ जनावरे आहेत. दुष्काळात या जनावरांना चारा मिळावा, यासाठी राज्य सरकाराच्या आदेशानंतर जिल्हा यंत्रणांनी नियोजन केले. त्यासाठी पूर्वतयारी करून शेतकऱ्यांना हे उत्पादन घेण्यासाठी सांगण्यात येत आहे. त्यांना या गाळपेर क्षेत्रात एक रुपये दराने भाडेपट्ट्यावर चारा उत्पादनासाठी धरणाखालील जमीन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी मका, ज्वारी, बाजरी किंवा वैरण समृद्ध पिके त्यावर घ्यावी, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यासाठी धरणातील पाणी, बियाणे विनामूल्य दिले जाणार आहे.

सरकारने प्रकल्पग्रस्त, स्थानिक भूमिहीन मागासवर्ग व त्यांच्या सहकारी संस्था, भूमिहीन मागासवर्गीय सहकारी संस्था, भूमिहीन सहकारी संस्था, भूमिहीन लोक, स्थानिक भूधारक यांना प्राधान्य दिले आहे. त्यानंतर गावातील जास्त पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना संधी मिळेल. 

चारा बंदी लागू करण्यात आल्याने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात चारा नेता येणार नाही. त्यामुळे आपल्याच जिल्ह्यात चारा निर्माण करून त्याचे नियोजन केले जात आहे. 

उन्हाळी हंगाम धरणात पाणी असल्यामुळे गाळपेर क्षेत्र कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहे. पण, उन्हाळ्यात धरणातील पाणी कमी झाल्यानंतर गाळपेर क्षेत्र वाढेल. त्यामुळे त्यातून ४८ टनापेक्षा जास्त चारा उत्पादन होईल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com