Agriculture news in marathi 486 crore reduction in crop loan target in Parbhani | Agrowon

परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६ कोटींची कपात 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) बॅंकांना खरीप हंगामात १ हजार २१३ कोटी २२ लाख रुपये आणि रब्बी हंगामात ४०६ कोटी ९८ लाख रुपये असे दोन्ही हंगामांत मिळून एकूण १ हजार ६२० कोटी २० लाख रुपये एवढे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 

परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) बॅंकांना खरीप हंगामात १ हजार २१३ कोटी २२ लाख रुपये आणि रब्बी हंगामात ४०६ कोटी ९८ लाख रुपये असे दोन्ही हंगामांत मिळून एकूण १ हजार ६२० कोटी २० लाख रुपये एवढे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप पीककर्जाचे उद्दिष्ट ४४१ कोटी ९८ लाख रुपयांनी तर रब्बी पीककर्जाच्या उद्दिष्टात ४४ कोटी ८९ लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. शुक्रवार (ता. १४) पर्यंत जिल्ह्यातील ३ हजार २९९ शेतकऱ्यांना २० कोटी २३ लाख रुपये (४. ९७ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यंदा राष्ट्रीयीकृत बॅंकांना (वाणिज्यिक बॅंका) खरीप हंगामात ७८१ कोटी ५८ लाख रुपये, तर रब्बीत २६१ कोटी ९९ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. खासगी बॅंकांना खरिपात १०१ कोटी १८ लाख रुपये तर रब्बीत ३४ कोटी २० लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला खरिपात १८७ कोटी ६३ लाख रुपये, तर रब्बीत ६३ कोटी १७ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला खरिपात १४२ कोटी ८३ लाख रुपये, तर रब्बीत ४७ कोटी ६५ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 

पीककर्ज वाटपाची गती संथ 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बॅंकांच्या कामकाजाची वेळेला मर्यादा घालण्यात आली आहे. कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यामुळे अनेक बॅंकाच्या शाखेत अपुरे मनुष्यबळ आहे. पीककर्ज वाटपावर परिणाम झाला आहे. शुक्रवार (ता. १४) पर्यंत राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ३१२ शेतकऱ्यांना २ कोटी ५१ लाख रुपये (०.९६ टक्का), खासगी बॅंकांनी १६३ शेतकऱ्यांना २ कोटी ५१ लाख रुपये (७.३४ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २६६ शेतकऱ्यांना २ कोटी ५७ लाख रुपये (१.३७ टक्का), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने २ हजार ५५८ शेतकऱ्यांना १२ कोटी ६४ लाख रुपये (८.८५ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. आजवर १७ शेतकऱ्यांनी २० लाख रुपयांच्या पीककर्जाचे नूतनीकरण केले आहे. सर्व बॅंकांनी मिळून ३ हजार २८२ शेतकऱ्यांना २० कोटी ३ लाख रुपयाचे नवीन पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना पीककर्ज वाटपात अद्याप गती दिसत नाही. बियाणे, खते आदी निविष्ठा खरेदी करण्यासाठी हाती पैसा नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना करून बॅंकांच्या कामकाजाच्या वेळेत वाढ करून पीककर्ज वाटपाचा वेग वाढवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 


इतर बातम्या
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
अलमट्टीवर आधुनिक रियल टाइम डाटा यंत्रणा...कोल्हापूर : पूरपरस्थितीचा सामना करण्यासाठी...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...
अकलूज नगरपालिकेच्या मागणीसाठी माळशिरसला...सोलापूर : अकलूज येथे नगरपालिका व नातेपुते येथे...
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहराला...अमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहरासाठी...
नांदेडमध्ये पीककर्ज वाटप संथ; ... नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ११६८ कोटी...
टोमॅटोचे दर उतरले; शेतकरी संतप्तनारायणगाव, जि. पुणे :  जुन्नर कृषी उत्पन्न...
‘एक गाव, एक वाण’साठी कारंजातील नऊ...वाशीम : राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी...
‘ताकारी’च्या लाभक्षेत्राची ड्रोनद्वारे...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या क्षेत्रातील...
खानदेशात पेरण्या रखडत; कमी पावसामुळे...जळगाव : खानदेशात खरिपातील पिकांच्या पेरणीला रखडत...
निम्न दुधना प्रकल्पात वाढली पाण्याची आवकपरतूर, जि. जालना : यंदा पावसाळा सुरू होताच पाऊस...
ब्रह्मगिरी पर्वतावर अवैध उत्खनन;...नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या...
उत्तर भारतात मॉन्सूनची प्रगती पुणे : उत्तर भारतात मॉन्सूनला प्रगतीसाठी पोषक...